Chhagan Bhujbal & Suhas Kande

Chhagan Bhujbal & Suhas Kande

Sarkarnama

भुजबळ-कांदे वाद; अखेर `ती` बैठक ठरली!

नाशिकच्या जिल्हा नियोजन समितीची आता शनिवारी बैठक

नाशिक : विधानसभा मतदारसंघाच्या विकासकामांना निधी मिळत नाही. त्यात परस्पर कपात करून अन्याय व नियमबाह्य कामे होत असल्याचा आरोप पालकमंत्र्यांवर (Chhagan Bhujbal) करुन शिवसेनेचे (Shivsena) आमदार सुहास कांदे यांनी राजकीय वादळ उठवले होते. हे प्रकरण उच्च न्यायालयासह मुख्यमंत्र्यांकडेही (Uddhav Thakre) गेले. या राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर याबाबतची बैठक आता येत्या शनिवारी होत आहे.

<div class="paragraphs"><p>Chhagan Bhujbal &amp; Suhas Kande</p></div>
नव्या वर्षात छगन भुजबळांनी नाशिकला दिले `हेल्दी` गिफ्ट!

शनिवारी होणाऱ्या बैठकीत हा वाद संपतो की नव्या वर्षात राजकारणाला नवा विषय देऊन जातो याची उत्सुकता आहे. यासंदर्भात जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी सकाळी साडेदहाला पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवन येथे होणारी ही बैठक यापूर्वी १० जानेवारीला होणार होती. मात्र, प्रशासकीय कारणास्तव आता शनिवारी होणार आहे.

<div class="paragraphs"><p>Chhagan Bhujbal &amp; Suhas Kande</p></div>
तहसीलदारांच्या आपुलकीने `त्या` ज्येष्ठाने आत्महत्येचा विचार सोडला!

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्यासह महापौर, जिल्ह्यातील खासदार व आमदार, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील आदींसह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य या बैठकीस उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, पालकमंत्री भुजबळ यांच्या उपस्थिती पाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक होणार असताना जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना मात्र कोरोनाची लागण झाली असून, ते क्वारंटाइन होणार असल्याने भुजबळ- कांदे निधी वाटपाचा विवाद, वाढीव निधीचा विषय याकडे लक्ष लागून आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com