विधवा नव्हे एकल महिला असे म्हणू या!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त विधवा प्रथाबंदीचा ठरवा केला.
Anita Bhamre with womens, Anita Bhamre News, NCP News
Anita Bhamre with womens, Anita Bhamre News, NCP NewsSarkarnama

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वर्धापनदिनानिमित्त शहर महिला (Womens) संघटनेतर्फे विधवा प्रथा बंदीचा ठराव करण्यात आला. तसेच, शहराध्यक्षा अनिता भामरे (Anita Bhamre) यांनी विधवा महिलांना आपल्या हाताने जोडवी घालत त्यांच्या कपाळावर कुंकू लावले. या भावनिक प्रसंगामुळे महिलांचे डोळे पाणावले होते. जोडवी घातल्याने आता नवीन जीवनास सुरवात होत असल्याचे सांगत शहर महिला काँग्रेसच्या उपक्रमाचे महिलांनी कौतुक केले. (NCP womens wing made a treaty on widow abrogate interdict)

Anita Bhamre with womens, Anita Bhamre News, NCP News
आदित्य ठाकरेंच्या आधीच नाशिकचे शिवससैनिक अयोध्येत दाखल

हेरवाड (जि. कोल्हापूर) गावाने विधवा प्रथांच्या निर्मूलनाचा ठराव अमलात आणला. या गावाचा आदर्श घेत राज्यातील अनेक गावांमध्ये त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. (Anita Bhamre News)

Anita Bhamre with womens, Anita Bhamre News, NCP News
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतांच्या फिल्डिंगची जबाबदारी धोत्रेंवर

विधवा महिलांना मंगळसूत्र न घालणे, हातातील बांगड्या फोडणे, कपाळावर कुंकू न लावणे, धार्मिक-मांगल्याच्या कार्यक्रमात सहभागी न होणे अशा अनिष्ट प्रथा सुरू आहेत. या प्रथांना तिलांजली देऊन विधवांना सन्मानाची वागणूक मिळावी म्हणून झालेल्या बैठकीचे अध्यक्षस्थान सौ. भामरे यांनी स्वीकारावे, अशी सूचना कुंदा सहाणे यांनी मांडली. त्यास योगिता आहेर यांनी अनुमोदन दिले.

या बैठकीत विधवा प्रथा बंदीचा ठराव मंजूर करण्यात आला. कार्यक्रमास अपेक्षा अहिरे, रूपाली पठारे, सरिता पगारे, मिनाक्षी गायकवाड, लता नागरे, संगीता चौधरी, हर्षदा बर्वे, कल्पना शिंदे, जिजाबाई घोडेराव, डॉ. मृगाक्षी क्षीरसागर, सिम्मी राणा, मंगला मोकळ, रूपाली अहिरे, वैशाली ठाकरे, शशिकला जगताप, संध्या बोराडे, अनिता पवार, अनसूया कांबळे, अनिता मोरे, अनु राणा, रेखा चौधरी आदी उपस्थित होत्या.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com