डॅाक्टर वधूची कौमार्य चाचणी; रुपाली चाकणकरांनी अहवाल मागितला

त्र्यंबकेश्वर मार्गावरील हॅाटेलमध्ये कौमार्य चाचणी होत असल्याची तक्रार होती.
डॅाक्टर वधूची कौमार्य चाचणी; रुपाली चाकणकरांनी अहवाल मागितला
Rupali ChakankarSarkarnama

नाशिक : उच्च शिक्षित वधु-वरांच्या विवाहात समाजातील प्रथेप्रमाणे जात पंचायतीच्‍या सांगण्यानुसार वधुची कौमार्य चाचणी केली जाणार असल्‍याच्या बातम्या होत्या. त्याची राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दखल घेतली आहे. याबाबत जिल्हा पोलिसांना अहवाल सादर करण्याचा आदेश देण्यात आला आले.

यासंदर्भात श्रीमती रूपाली चाकणकर यांनी व्टीट करून ही माहिती दिली आहे. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर मार्गावरील एका रिसॅार्टमध्ये डॅाक्टर वधूच्या कौमार्य चाचणी घेण्यात येणार असल्याबाबत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज केला होता. त्याबाबत महिला आयोगाने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Rupali Chakankar
गुन्हा दाखल होऊनही गिरीश महाजन निर्धास्त कसे?, काय आहे कारण...

यासंदर्भात मंगळवारी महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ अंतर्गत कलम १० (१) (फ) (एक) व (दोन) नुसार या तक्रारीची दखल घेतली आहे. त्याबाबत स्पष्टीकरण करणारा सद्यःस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याबाबत उपसचिव दिया ठाकूर यांनी पत्र पोलिसांना दिले आहे.

दरम्यान या तक्रारीनंतर बातम्या प्रसारीत झाल्या होत्या. समाजमाध्यमांवर देखील विविध पोस्ट फिरत होत्या. त्यामुळे पोलिसांनी त्याची दखल घेतली. पोलिसांच्‍या उपस्‍थितीत हा विवाह समारंभ पार पडला. अशा कुठल्‍याही स्वरूपाच्या प्रथा राबविल्‍या जात नसल्‍याचा जबाब वधू-वर पक्षातर्फे दिला असल्‍याची माहिती त्र्यंबकेश्‍वरचे पोलिस निरीक्षक संदीप रणदिवे यांनी दिली होती.

....

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in