ग्रामपंचायतीत पराभूत झालेल्यांनी `नासाका` प्रश्नी राजकारण करू नये!

आठ वर्षांपासून बंद असलेल्या नासाकाची सुलभ पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतीत पराभूत झालेल्यांनी `नासाका` प्रश्नी राजकारण करू नये!
Devidas Pingle, NCP leaderSarkarnama

नाशिक : आठ वर्षांपासून बंद असलेल्या नासाकाची सुलभ पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. (Tender process will follow for Nashik Sugar Factory closed down from last eight years)विशेष म्हणजे याप्रश्नी सर्वाधिकार जिल्हा बँक प्रशासक यांना प्रदान करण्यात आले आहेत. श्रेयवादात पडायचे नसून मी व आमदार सरोज आहिरे (Saroj Ahire) नासाका सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. काही अल्प संतुष्ट राजकीय मंडळींनी विरोध करून विघ्न आणू नये, नासाकाबाबत राजकारण बंद करावे, असे आवाहन माजी खासदार तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे (Devidas Pingle) यांनी केले आहे

Devidas Pingle, NCP leader
आमदार सरोज अहिरे शिवसेनेला खरोखर शिंगावर घेतील?

साडेबाराशे मेट्रिक टन गाळप क्षमता असलेल्या या कारखान्याचे नाशिक, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात जवळपास सतरा हजार सभासद आहेत. आठ ते दहा वर्षांपासून कारखाना बंद आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांच्या अडचणी वाढल्या आहेत. या अडचणींवर मात करण्यासाठी नाशिक बाजार समितीचे सभापती तथा माजी खासदार देवीदास पिंगळे व आमदार सरोज अहिरे यांच्या प्रयत्नातून सहकारमंत्री यांच्या आदेशाने जिल्हा सहकारी बँकेने गेल्या महिन्यात निविदा प्रक्रिया राबविली होती. यावेळी एकच निविदा प्राप्त झाली होती, प्रतिस्पर्धी निविदा कोणी भरली नव्हती. यामुळे मुंबई मंत्रालयात सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नासाका सुरू करण्यासंदर्भात ,मागील महिन्यात पार पडलेल्या बैठकीत निविदा प्रक्रिया पुन्हा राबवावी असे आदेशित करण्यात आले होते. नासाकासाठी निविदा प्रक्रिया पार पडणार आहे. यात मागील निविदेत अमानत रक्कम ही अडीच कोटीची पंचवीस लाख रुपये, तर भाडेतत्व करारनामा पंधरा वर्ष मर्यादा नसून पंचवीस वर्ष केली आहे. तसेच वार्षिक भाडे अडीच कोटी रुपये होते. ते आता पन्नास लाख रुपये ठेवण्यात आले आहे. यामुळे अधिक अधिक संस्था यात भाग घेतील.

शेतकरी पुत्र असून नेहमीच शेतकरी हिताचा विचार करत असतो. ज्यांना सहकार क्षेत्रातील काही गंध नाही, तसेच ग्रामपंचायतीमध्ये निवडून येण्याची ताकद नाही. काही मंडळी स्वर्गीय उत्तमराव ढिकलेच्या नावामुळे निवडून आले होते. यांनी विवेकबुद्धीचा वापर करून शेतकरी हिताचा विचार करावा. नासाका सुरू होत असताना त्यास आडवे येऊ नये व स्वार्थी राजकारण बंद करावे.

- देवीदास पिंगळे, माजी खासदार, तथा सभापती बाजार समिती, नाशिक.

...

Related Stories

No stories found.