Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांची वीज खंडित करू नका!

निफाड व येवला तालुक्यातील कोरोनासह इतर विषयावर आढावा बैठक झाली.

येवला : सध्या शेतकऱ्यांच्या खिशात पैसे नाहीत, त्यामुळे शेतीसाठी दिवाळी होईपर्यंत रोहित्र सुरू ठेवावेत असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिले. सवलत मिळाली तरी शेतकरी बांधवांनी वीजबिल भरून थकबाकी मुक्ती योजनेचा लाभ घ्यावा, महावितरणला सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या कमी करण्यासाठी तसेच सणोत्सवांच्या अनुषंगाने लसीकरण वाढविण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Chhagan Bhujbal
देगलूरच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झालेच पाहिजे!

येथील विश्रामगृहावर आज निफाड व येवला तालुक्यातील कोरोनासह इतर विषयावर आढावा बैठकीत श्री.भुजबळ यांनी या सूचना दिल्या. बैठकीस जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, कृषी सभापती संजय बनकर, पंचायत समितीचे गटनेते डॉ. मोहन शेलार, बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंतराव पवार, संपर्क कार्यालय प्रमुख बाळासाहेब लोखंडे, नगरसेवक दीपक लोणारी, साहेबराव मढवई, भाऊसाहेब धनवटे, मकरंद सोनवणे, संतोष खैरनार, सुनील पैठणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Chhagan Bhujbal
शववाहिकेच्या प्रतिक्षेत आदिवासी माय लेकराच्या मृतदेहाची १२ तास परवड!

तालुक्यात शेतीपंपाची वीज जोडणी तोडली जात असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत याकडे गटनेते डॉ. शेलार यांनी लक्ष वेधले. पूर्वसूचना न देता वीज तोडली जात असल्याने पिकांना पाणी देणे शक्य होणार नाही. शेतकऱ्यांकडे पैसा येईपर्यंत सवलत द्यावी अशी अपेक्षा शेलार यांनी व्यक्त केली. यावर भुजबळांनी अधिकाऱ्यांकडून परिस्थिती समजून घेत दिवाळीपर्यंत बिल भरण्याची संधी देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करा अशा सूचना दिल्या. राज्य शासनाच्या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ६० ते ७० टक्क्यापर्यंत थकबाकीत सवलत मिळणार असल्याने शेतकऱ्यांनीही बिलाची थकबाकीसह चालू बिले भरण्याचे आवाहन भुजबळांनी केले.

धर्मगुरूंमार्फत जनजागृती

ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी मालेगावच्या धर्तीवर धर्मगुरू यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. शंभर टक्के लसीकरण होण्यासाठी लसीकरण केंद्राची संख्या वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना केल्या. तालुक्यात सुरू करण्यात आलेला ऑक्सिजन प्रकल्प सुरळीतपणे सुरू राहणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रकल्पाचा वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी नियोजन करावे असे ते म्हणाले.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले असल्याने नुकसानीचे पंचनामे वेळेत पूर्ण करण्यात येऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी अहवाल सादर करण्यात यावा, असेही श्री. भुजबळ यांनी सांगितले.

यावेळी प्रांताधिकारी सोपान कासार, डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार प्रमोद हिले, निफाडचे तहसीलदार शरद घोरपडे, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, गटविकास अधिकारी डॉ. उमेष देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कृपास्वामी, महावितरणचे कार्यकारी अभियंता संजय तडवी, उपकार्यकरी अभियंता आर. एम. पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, तालुका कृषि अधिकारी ए. एस. आढाव, बी. जी. पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजित कोशिरे, डॉ. हर्षल नेहेते आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com