`अधिकाऱ्यांनो मक्तेदारांची दलाली करू नका`

महापौर जयश्री महाजन यांनी अधिकाऱ्यांना तंबी देत आमदार भोळेंसह कामाची पाहणी केली.
Jalgaon Mayor Jayshree Mahajan
Jalgaon Mayor Jayshree MahajanSarkarnama

जळगाव : शहरातील (Jalgaon) रस्त्यांची तसेच इतर सुरू असलेल्या कामांची गुणवत्ता ठेवा, ते चांगले असेल तरच त्याला मंजुरी द्या, केवळ मक्तेदारांची दलाली करू नका, अशी तंबी महापौर जयश्री महाजन (Mayor Jayshree Mahajan) यांनी महापालिकेच्या (Jalgaon Corporation) बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. आमदार सुरेश भोळे (Suresh Bhole) यांच्यासमवेत त्यांनी शहरातील विविध विकासकामांची पाहणी केल्यानंतर सायंकाळी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

Jalgaon Mayor Jayshree Mahajan
भाजप नेत्यांपुढे शिवसेनेची पात्रता काय? त्यांनी लायकीप्रमाणे वागावे

जळगाव महापालिकेची शहरात रस्ते व गटारीची विविध विकासकामे सुरू आहेत. त्यातील काही कामांबाबत नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. या कामाच्या गुणवत्तेची पाहणी बुधवारी महापौर जयश्री महाजन यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली, या वेळी त्यांनी सुरू असलेल्या कामांचा आढावाही घेतला. नेहरू चौक, पिंप्राळा, खेडी या भागातील रस्ते व इतर कामांची त्यांनी पाहणी केली.

Jalgaon Mayor Jayshree Mahajan
‘भाजपचे शंभर दाऊद, तर सेनेचा एकच राऊत’

अधिकाऱ्यांना तंबी

दुपारी कामाची पाहणी केल्यानंतर सायंकाळी त्यांनी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. महापौर दालनात सायंकाळी ही बैठक घेण्यात आली. या वेळी उपमहापौर कुलभूषण पाटील उपस्थित होते. महापौर जयश्री महाजन यांनी अधिकाऱ्यांकडून शहरातील सर्व कामांची सद्यःस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी शहरातील कामाच्या गुणवत्तेबाबत स्पष्ट आदेशच दिले. त्यांनी सांगितले, की शहरातील कामे सुरू आहेत, मात्र त्याच्या गुणवत्तेवर लक्ष द्या, गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू नका. काम गुणवत्तेत नसेल तर तातडीने तसा अहवाल द्या. निकृष्ट कामास मंजुरी देऊन मक्तेदाराची दलाली करू नका.

...अन्यथा मक्तेदार काळ्या यादीत

शहरातील कामांबाबत महापौर जयश्री महाजन यांनी सांगितले, की शहरात सद्यःस्थितीत एकूण १६८ कामांचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातील ७२ कामे पूर्ण झाली आहेत. ७२ कामे अपूर्णावस्थेत आहेत. २२ कामे अद्याप मक्तेदाराने सुरूच केलेली नाहीत. त्यामुळे ही कामे मक्तेदारांनी आठ दिवसांत सुरू करावीत अन्यथा या मक्तेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांना पाच वर्षे महापालिकेची कोणतीही कामे देण्यात येणार नाहीत.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com