नोकरी काय मागता? नोकरी देणारे बना!

कौशल्य विकास केंद्राचे उदघाटन राजेश टोपे यांच्या हस्ते झाले.
Rajesh Tope, Health Minister
Rajesh Tope, Health MinisterSarkarnama

नाशिक : महाराष्ट्रातील मराठी उद्योजकांनी आपल्या परिश्रमातून जागतिक पातळीवर चांगले नाव कमावले आहे. त्यामुळेचे ते प्रेरणादायी आहेत. त्यामुळे नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे होण्याचा ध्यास प्रत्येकाने घेतला पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.

Rajesh Tope, Health Minister
काँग्रेसच्या नगरसेविका व पतीने केली ४ कोटींची फसवणूक

अंबड औद्योगिक वसाहतीतील इंडोपंप कंपनीतील कौशल्य विकास केंद्राचे उद् घाटन श्री. टोपे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, औद्योगिक संस्था व कंपनीतील कामगार यांच्यातील दुवा म्हणून काम करण्यासाठी कौशल्य अंगी असलेले कामगार तयार व्हावेत म्हणून ही योजना महत्त्वपूर्ण आहे. या कौशल्य विकास केंद्राचा लाभ अर्धकुशल तसेच अन्य कामगारांना नक्कीच होईल. यातून तयार होणाऱ्या कौशल्यनिपुन कामगारांमुळे कंपन्यांचा वेळ व उत्पादन प्रक्रीयेतील वेळेची बचत होईल.

राजेश टोपे यांनी यावेळी येथील कामगार, अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या प्रकल्पाची माहिती घेतली. ते म्हणाले, आपल्यात इच्छाशक्ती व दुरदृष्टी आणि कष्ट घेण्याची तयारी असेल तर यश नक्की मिळते. असेच कार्य या संस्थेचे एन. डी. ठाकरे यांनी केले आहे. त्यांनी अनेकांना रोजगार उपलब्ध केला आहे. ध्यास घेऊन काम केले आहे. नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा, हा ध्यास घेत नाशिकमधील उद्योजकांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे नाव कमविले आहे.

यावेळी इंडोपंप कंपनीचे संचालक एन. डी. ठाकरे, अनिकेत गुंजाळ, चेतन ठाकरे, उदय ठाकरे, आर. डी. चव्हाण आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com