`यामुळे` यंदा आतषबाजीसह दिवाळी होणार धुमधडाक्यात!

उत्तर महाराष्ट्रात फटाके विक्री व फोडण्यास बंदी करण्याचे आदेश नुकतेच काढले होते.
Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal Sarkarnama

नाशिक : पर्यावरण आणि प्रदुषण नियंत्रणाचा भाग म्हणून `माझी वसुंधरा` (Part of envirnment & Polluation control drive Government banned crackers) या उपक्रमांतर्गत उत्तर महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी घालण्याचे परिपत्रक विभागीय आयुक्तांनी (Divisional commissioner issue thea order) काढले होते. त्यामुळे यंदाची दिवाळी सुनी सुनी साजरी होणार असे चित्र होते. मात्र आज एकाच वेळी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे आदेश मागे घेण्याचे आवाहन केले. मुख्य सचिवांनी (Chief secretary) ते रद्द केले. तर महापालिकेने हा प्रस्ताव फेटाळला. त्यामुळे दिवाळी धुमधडाक्यात साजरी होणार.

Chhagan Bhujbal
मोदी साहेब, आम्ही बैलगाडीतून कॉलेजला जायचे का?

यासंदर्भात राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्याकडे फटाके विक्रेत्यांनी निवेदन दिले होते. दिवाळीत नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, आणि नगर जिल्ह्यात फटाके विक्री व फोडण्यास बंदी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नुकतेच काढले होते. संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून नगरपालिका, महापालिका, नगरपरिषदांमध्ये सभा घेऊन फटाके बंदीचे ठराव संमत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यागोयोगाने त्याच दिवशी महापालिकेने फटाक्याच्या गाळ्यांच्या निविदा काढल्या होत्या. फटाके विक्रेते नाराज होते. नाशिकच्या विक्रेत्यांनी उच्च न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिला होता. पालकमंत्री भुजबळ यांना निवेदन देण्यात आले होते. त्यावर श्री. भुजबळ यांनी प्रशासनाला आदेश मागे घेण्याचे आवाहन केले होते. दुपारी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी फटाके बंदीचा आदेश मागे घेण्याचे पत्र दिले.

Chhagan Bhujbal
दिवाळीपूर्वी कर्जमुक्ती न दिल्यास सरकारची दिवाळी कडू

फटाक्यांवर बंदी विभागीय पातळीवर पहिल्यांदाच घालण्यात आल्याने स्थानिकांसह फटाके विक्रेत्यांमध्ये तीव्र नाराजी होती. जळगाव जिल्हा फटाके व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारीच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेवून विभागीय आयुक्तांचा निर्णय मागे घेण्याबाबत पत्र दिले होते. विभागीय आयुक्तांच्या या निर्णयावर हिंदुत्ववादी संघटनांनीही नाराजी व्यक्त केली होती. आता हे आदेश रद्द ठरल्याने कोरोनाची बंधने शिथिल होण्याच्या पार्श्वभूमीवर यंदा दिवाळी धुमधडाक्यात साजरी होणार आहे.

यासाठी घातली होती बंदी...

विभागीय आयुक्तांनी शासनाच्या माझी वसुंधरा अभियानाचा संदर्भ देत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी फटाके बंदीचा ठराव करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचे प्रारूप टूलकीटनुसार फटाके बंदीसाठी पुढाकार घेण्यात आला असून, पर्यावरण संवर्धन व हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शंभर गुण देण्यात आले आहेत. दिवाळीत फटाक्यांमुळे वातावरण दुषीत होते. शहरी भागात अधिक प्रमाण असल्याने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात फटाक्यांच्या विक्री व वापरावर बंदी घालण्याच्या दृष्टीने ठराव करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले होते.

फटाके असोसिएशनचे जयप्रकाश जातेगावकर (नाशिक) व कार्याध्यक्ष यूसुफ मकरा (जळगाव) यांनी सांगितले, की आजच मंत्री भुजबळ, व गुलाबराव पाटील यांनी मध्यस्थी करत फटाके बंदीचा तिढा सोडवला. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी हा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले. राष्ट्रीय प्रदुषण नियंत्रण विभागातर्फे फटाके प्रमाणित केलेले असतात. असेच फटाके आम्ही विकतो, असे सांगितले.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com