शिवसेना अन् भाजपचे नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून गेले

उपमहापौर कुलभूषण पाटील व नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या शाब्दीक चकमक झाली.
BJP and Shiv Sena corporators

BJP and Shiv Sena corporators

sarkarnama

जळगाव : जळगाव महापालिकेच्या महासभेत दलीत वस्ती निधीबाबत घेण्यात आलेल्या मतदानावरून सत्ताधारी शिवसेना (ShivSena) व विरोधी भाजप यांच्यात चांगलाच वाद झाला. यातून भाजप (BJP) नगरसेवकांनी व्यासपीठावर धाव घेतली त्यावेळी उपमहापौर तसेच नगरसेवकांत धक्काबुक्की झाली. या वेळी सभागृहात चांगलेच रणकंदन झाले, दोन्ही गटाच्या नगरसेवकांनी घोषणाबाजी केली.

तब्बल दोन वर्षानंतर जळगाव महापालिकेची ऑफलाईन सभा आज (ता. १५) आयोजित करण्यात आली होती. महापौर जयश्री महाजन सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या, तर उपमहापौर कुलभूषण पाटील, आयुक्त डॉ. सतीश कुळकर्णी, नगरसचिव सुनील गोराणे व्यासपीठावर उपस्थित होते. सभेच्य प्रारंभी व्यासपीठावर उपमहापौर बसण्याबाबत भाजप नगरसेवक कैलास सोनवणे यांनी आक्षेप घेतला. त्यावरून उपमहापौर कुलभूषण पाटील व नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या शाब्दीक चकमक झाली. मात्र हा वाद शमला. त्यानंतर सभा सुरू झाली. सभेत बहुतांश विषयावर चर्चा करण्यात आली. सर्वानुमते विषयही मंजूर झाले.

<div class="paragraphs"><p>BJP and Shiv Sena corporators</p></div>
पिंपरी पालिका आयुक्तांविरुद्ध भाजपने दिला अविश्वास ठरावाचा इशारा

समसमान मतांचा दावा

सभा अंतीम टप्यात असतांना दलीत वस्तीच्या निधी प्रभाग क्रमांक दहामध्ये वापरण्यावरून भाजप व शिवसेना यांच्यात एकमत झाले नाही. भारतीय जनता पक्षाने त्याला विरोध केला. त्या वेळी शिवसेनेने तो मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली. त्या वेळी मतदान घेण्यात यावे, असा निर्णय झाला. त्यानुसार मतदान घेण्यात आले. त्यात समसमान मते पडल्याचा सत्ताधारी शिवसेनेचा दावा होता. तर भाजपने आपल्याला २६ व शिवसेनेला २५ मते पडल्याचा दावा केला होता. मात्र, महापौर जयश्री महाजन यांनी प्रस्तावावर समसमान मते पडल्याचा दावा केला. भाजपचा एक मत जास्त मिळल्याचा दावा कायम होता.

भाजप सदस्य व्यासपीठावर धावले

हा वाद सुरू असतांनाच महापौर जयश्री महाजन यांनी सभा संपल्याचे जाहिर केले, त्यानंतर राष्ट्रगितास प्रारंभ झाला. याच दरम्यान उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मतदान घेतल्याच्या कागदावर एका मतासाठी टिकमार्क करून मते समसमान करून तो कागद नगरसचिव गोराणे यांच्याकडे देत असल्याचा संशय भाजप नगरसेवकांना आला आणि त्याच वेळी भाजप नगरसेवक व्यासपीठावर धावले. त्यांनी नगरसचिव यांच्या हातातून कागद घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनीही हा कागद आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला.

<div class="paragraphs"><p>BJP and Shiv Sena corporators</p></div>
महापौर मोहोळांनी अमित शहांना पुणे पालिकेत आणलेच!

सदस्यात झाली धक्काबुक्की

भाजपच्या महिला सदस्यही व्यासपीठावर गेल्या त्यात एकच गदारोळ सुरू झाला. त्या वेळी उपमहापौर कुलभूषण पाटील व भाजप सदस्य नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात पुन्हा शाब्दीक वाद झाला. भाजप सदस्य जितेद्र मराठे तसेच महिला सदस्य अधिकच आक्रमक झाले. त्या मुळे पाटील व भाजप नगरसेवकांत धक्काबुक्की झाली. त्या वेळी एकच गोंधळ उडाला. त्यामुळे पोलिसांनाही व्यासपीठावर जात सदस्यांमध्ये हस्तक्षेप करावा लागला.

भाजपचा ठिय्या, शिवसेनेची घोषणाबाजी

भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी उपमहापौरांच्या निषेधाच्या घोषणा देत सभागृहातच ठिय्या आंदोलन केले. तसेच राष्ट्रगितांचा अपमान झाल्याचा निषेध करीत उपमहापौरांनी माफी मागावी अशी मागणी केली. तर सत्ताधारी शिवसेनेच्या सदस्यांनीही घोषणाबाजी केली. यानंतर दोन्ही गटातील सदस्यांनी आपआपल्या सदस्यांना शांत केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com