Shirdi Politics : आठवलेंनी शिर्डीवर दावा करताच लोखंडेंचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'राखीव माणसाची धोपटी सोबतच असते..'

Sadashiv Lokhande On Ramdas Athawale: रामदास आठवले यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघावर दावा केल्याने खासदार सदाशिव लोखंडे कात्रीत सापडले आहेत.
Sadashiv Lokhande and Ramdas Athawale
Sadashiv Lokhande and Ramdas Athawale Sarkarnama

Ahmednagar Political News: 'आरपीआय'चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठीची 'एनडीए'कडून उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. तर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेना ठाकरे गटात घरवापसी केल्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे आता शिंदे गटाचे शिर्डीचे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे कात्रीत सापडले आहेत.

याबाबत बोलताना सदाशिव लोखंडे यांनी खुलासा करत रामदास आठवले यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचे काम करू, असे स्पष्ट केले. मात्र, हे सांगताना सदाशिव लोखंडेंनी 'राखीव माणसाची धोपटी सोबतच असते' असे सूचक वक्तव्यही केले.

Sadashiv Lokhande and Ramdas Athawale
Anil Deshmukh On Bawankule : बावनकुळेंनी पदाला शोभेल, असे बोलावे; पवारांची उंची त्यांना नाही कळणार !

आठवले यांनी शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त करत याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगितले. तसेच आपली दावेदारी आणि उमेदवारी पक्की असल्याचे सांगण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला.

या पार्श्वभूमीवरच सदाशिव लोखंडे यांना माध्यमांनी विचारले असता आमची तीन चार-पक्षांची महायुती असल्याचे सांगत पक्षाला मान्य असेल त्यांना उमेदवारी दिली तर कोण अडवणार, असे म्हणत पक्ष जे बोलेल ते करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

रामदास आठवले यांना 2024 च्या लोकसभेसाठी शिर्डीतून उमेदवारी मिळाली तर आम्ही त्यांचे काम करू, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. मात्र, ही ग्वाही देताना राखीव माणसाची धोपटी सोबतच असते, असे सूचक वक्तव्य करत जनता जे ठरवेल ते मान्य असेल, असेही लोखंडे म्हणाले.

Sadashiv Lokhande and Ramdas Athawale
Bhosari Land Scam News : भोसरी 'MIDC' कथित भूखंड घोटाळा प्रकरण ; न्यायालयाचे खडसेंबाबत 'हे' महत्वाचे निर्देश

भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिवसेना ठाकरे गटात झालेली घरवापसी आणि संभाव्य उमेदवारी बद्दल बोलताना लोखंडे यांनी सर्व पक्षांना उमेदवार देण्याचा अधिकार असल्याचे सांगत त्यांच्या उमेदवारीने आम्हाला चिंता नाही नसल्याचा दावा केला. 2014 ला मी ऐनवेळी उमेदवारी मिळाली तरी केवळ सतरा दिवसांच्या प्रचारात खासदार झालो.

2019 ला देखील जनतेने माझाच विचार केला असल्याच्या त्यांनी सांगितले. 2024 साठी आता आमच्यासोबत अजित पवार आहेत. माझ्या कार्यकाळात केंद्र आणि राज्याच्या अनेक योजना मतदारसंघात आणल्या. जनता जनार्दन जो निर्णय देईल, तो आम्ही मान्य करू, असेही लोखंडे यावेळी म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in