नेते बुडवणार जिल्हा बँक...संचालक गणपतराव पाटील ६ कोटींचे थकबाकीदार

आमदार, संचालक व नेत्यांच्या कुटुंबातच वाटले कोटींचे कर्ज, नंतर थकवले.
NDCC Bank Building With Ex Director Ganpatrao Patil
NDCC Bank Building With Ex Director Ganpatrao PatilSarkarnama

नाशिक : येथील जिल्हा बँक (NDCC Bank) अडचणीत आहे. रिझर्व्ह बँकेचे निर्बंध (Restrictions of RBI) असल्याने शेतकऱ्यांना कर्ज नाही, (Farmers do not get loans) खात्यातले पैसे मिळत नाही, ठेवीदारांना (Depositors) उपचारासाठी रुपया मिळत नाही. याला कारणीभूत फक्त बँकेचे संचालक, राजकीय नेते आहेत. या संचालकांनी स्वतः व स्वतःच्या कुटुंबात कोट्यावधींचे कर्ज वाटले व थकवल्याचे जाहीर झाले आहे. (MLA & Bank Directors given finance to thereself & Family members)

NDCC Bank Building With Ex Director Ganpatrao Patil
NCP: युवतीवर अत्याचार होऊनही महाराष्ट्रातील `ईडी` सरकार संवेदनाहीन!

नाशिक जिल्हा बँक आर्थिक अडचणीत आहेत. गेल्या तीन वर्षापासून तीथे प्रशासक काम पहात आहेत. यातील बहुतांश संचालक निष्क्रीय होते. सध्याचे प्रशासक अरुण कदम मात्र मनापासून कामाला लागले आहेत. त्याचा प्रत्यय देखील आला. त्यांनी सध्या बड्या थकबाकीदारांकडे सक्तीने कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांनी शंभर मोठ्या थकबाकीदारांची यादी जाहीर केली. ही यादी विविध गावांत सुचना फलकावर लावल्याने एकच खळबळ उडाली. बँकेला घरची मालमत्ता समजणाऱ्या अनेक नेत्यांची झोप उडाली.

NDCC Bank Building With Ex Director Ganpatrao Patil
Maratha: निलंबित पोलिस निरिक्षक बकालेंना अटक केव्हा करणार?

थकबाकीदारांच्या यादीत सर्वाधीक थकबाकी तीस वर्षे संचालक राहिलेल्या व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील, भारतीय जनता पक्षाचे आमदार दिपीप बोरसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या माणिकराव कोकाटे, माजी आमदार धनराज महाले यांच्याशी संबंधीत आप्तस्वकीयांकडे असल्याचे दिसते. गणपतराव पाटील, त्यांचे दोन भाऊ यांच्याकडे १४.९० कोटींची थकबाकी आहे. कर्ज वसुलीसाठी आजी - माजी संचालकांसह त्यांच्या नातेवाइकांभोवतीही कारवाईचा फास आवळला आहे.

थकबाकी वसुलीसाठी अनेकदा नोटिसा देऊनही संबंधित दाद देत नसल्याने अखेरीस या थकबाकीदारांची नावे सार्वजनिक करीत त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. माजी संचालकांनी घेतलेल्या चुकीच्या आर्थिक निर्णयांमुळे जिल्हा बँक सध्या आर्थिक संकटात आहे. बँकेच्या पीक व शेती कर्जाची १,९१० कोटींवर गेली आहे. ही वसुली झाली तर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सुटतील. बँक पुर्वपदावर येण्यास मदत होईल. मात्र हे नेते मुग गिळून गप्प आहेत.

यासंदर्भात बँकेचे अधिकारी शासन, पालकमंत्री नेत्यांपुढे फारशी आक्रमक भूमिका घेत नाहीत. याबाबत बँकेच्या कर्मचारी संघटनेने पुढाकार घेऊन शासनाकडे पाठपुरावा केला होता. तेव्हा ते उपमुख्यमंत्र्यांना भेटण्यास जाणार याची कुणकुण लागताच, कर्मचाऱ्यांच्या आधीच थकबाकीदारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेले माजी संचालक तीथे दिंडोरीच्या मोठ्या नेत्याला घेऊन हजर झाले होते. असे अनेक प्रसंग व अडचणी प्रशासनापुढे आहेत. सध्याच्या प्रशासकांनी मात्र याबाबत आक्रमक होत कठोर भूमिका घेतली आहे. या थकबाकीदारांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

हे आहेत प्रमुख थकबाकीदार नेते...

संचालक गणपतराव पाटील- ६.५३ कोटी,

दत्तात्रय पाटील (सभापती)- १.२५ कोटी,

विद्या पाटील (मा. अध्यक्ष, जि. प.)- ५५ लाख,

शोभा डोखळे (सभापती)- २२ लाख,

विजय कोकाटे (आमदार बंधू)- २१.३१ लाख,

छाया भरत गोतरणे (नेत्या)-२१ लाख,

दौलत मंगळू बोरसे (आमदार बंधू)- ४७.५१लाख,

सयाजी मंगळू बोरसे (आमदार बंधू)- ३१.९२ लाख,

संगीता दिलीप बोरसे (आमदार कुटुंब)- २२.४८ लाख

राजेंद्र पिंगळे (नेते)- २३ लाख.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in