दिलीप वाघ करणार राष्ट्रवादीच्या गद्दारांचा 'करेक्ट' बंदोबस्त!

भडगाव येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वक्ता प्रशिक्षण शिबिर झाले.
Dilip Wagh, NCP

Dilip Wagh, NCP

Sarkarnama

भडगाव : मागील काळात विधानसभा निवडणुकीत पक्षात राहून उमेदवारविरोधी यंत्रणा राबविणारे व पक्षात राहून कुरघोडी करणाऱ्यांच्या हकालपट्टीचा कार्यक्रम केला जाईल. पक्षात कमी लोक राहिले तरी चालतील, पण प्रामाणिक राहा. आगामी निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी मी झटेल, मदत करेन, त्यांना विविध पदावर बसवेल, पण ज्यांनी गद्दारी केली. त्यांचा 'करेक्ट' बंदोबस्त केला जाईल, असा इशारा माजी आमदार दिलीप वाघ (Ex MLA Dilip Wagh) यांनी दिला.

<div class="paragraphs"><p>Dilip Wagh, NCP</p></div>
अंबानींच्या घराखाली गाडी का ठेवली?, हे अजून तरी कळलं का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वक्ता प्रशिक्षण शिबिरात श्री. वाघ बोलत होते. ते पुढे म्हणाले, की काहींनी पक्षात राहून दडपण आणून परस्पर तिकीट घेतली. आता त्यांना सांगून कुस्ती खेळली जाईल. आगामी निवडणुकांमध्ये त्याची झलक पाहायला मिळेल. मागील विधानसभा निवडणूक आर्थिक मुद्यावर झाली. उमेदवार उभा करून मतांचे विभाजन झाले. त्यामुळे पराभव पत्करावा लागला.

<div class="paragraphs"><p>Dilip Wagh, NCP</p></div>
शिवसेनेने भाजपला दिला वर्क ऑर्डरचा राजकीय डोस!

ते म्हणाले, पराभवातून अनुभव घ्यायचा व पुढे चालायचे ही शिकवण आपल्याला आहे. कार्यकर्त्यांसाठी २०२२ हे निवडणुकांचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणूक आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची जादूची छडी जिल्हा परिषदेत काम करून एकहाती सत्ता बसेल. पुढे केंद्रातही महाविकास आघाडीचा फॉर्म्युला काम करेल. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाईल व आपली सत्ता बसेल, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. दरम्यान,

राष्ट्रवादीच्या नव्या फळीतील तरुणांनी हा कार्यकर्ता मेळावा मेहनत घेऊन यशस्वी केला. तालुक्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते मेळाव्यास उपस्थित होते. मात्र, मागच्या काळात पक्षात विविध पदे उपभोगलेल्या पदाधिकाऱ्यांनी मेळाव्यात पाठ फिरवली होती. त्यांना पक्षातून नारळ देऊन मागे टाका, असा सूर अनेकांच्या भाषणातून पुढे आला. तर पक्षवाढीवर भर देऊन पक्षाची कामे व योजना गल्लोगल्ली सांगा. कार्यकर्त्यांची फळी तयार ठेवा, सर्व निवडणूक आपल्याला जिंकायच्या आहेत. पक्षाच्या ध्येयधोरणाची माहिती मनोगतातून डॉ. संजीव पाटील, शालिग्राम मालकर, नितीन तावडे यांनी दिली.

दरम्यान, राष्ट्रवादी पदवीधर संघटना प्रदेश उपाध्यक्ष शेषराव भोसले, जिल्हा प्रवक्ते भूषण पाटील, डॉ. संजीव पाटील, शालिग्राम मालकर, नितीन तावडे, स्नेहा गायकवाड, एस. एन. पाटील, दत्तू मांडोळे आदींनी कार्यकर्त्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. या शिबिराला राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. संजीव पाटील, शालिग्राम मालकर, तालुकाध्यक्ष राहुल पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष शेषराज भोसले, दत्तात्रय पवार, पाचोरा तालुकाध्यक्ष विकास पाटील, रेखा पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख नितीन तावडे, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष अरुण सोनवणे यांसह विविध कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in