धुळ्यात काँग्रेसला धक्का; प्रा. शरद पाटील शिवबंधनात!

माजी आमदारांच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रा. पाटील यांनी शिवसेना प्रवेश केला.
Uddhav Thakre welcomes Prof Sharad Patil & his colligues.
Uddhav Thakre welcomes Prof Sharad Patil & his colligues.Sarkarnama

मुंबई : शिवसेनेची (Shivsena) पुन्हा एकदा नव्याने व जोमाने उभारणी करण्यासाठी साथ द्या, असे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेhttps://www.sarkarnama.in/topic/uddhav-thackerayयांनी आज मुंबईत झालेल्या माजी आमदारांच्या बैठकीत केले. त्याला प्रतिसाद देत धुळे (Dhule) काँग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष व पुर्वाश्रमीचे शिवसेना आमदार प्रा. शरद पाटील यांनी शिवबंधन बांधले. Congress leader Sharad Partil resignes congress & joins shvsena)

Uddhav Thakre welcomes Prof Sharad Patil & his colligues.
शिवसैनिक नाराज, आगामी काळात वेगळे चित्र पाह्यला मिळेल : शरद पवारांचे संकेत

राज्यातील शिवसेना आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत अतिशय वेगाने घडामोडी घडत आहेत. स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सक्रीय झाले आहेत. त्यांनी आज पक्षाच्या सर्व माजी आमदारांची बैठक घेतली. या बैठकीस राज्यभरातून ७० आमदार उपस्थित होते, असा दावा करण्यात आला. या सर्व आमदारांना थेट `मातोश्री`तून दुरध्वनी करण्यात आले होते. काही माजी आमदारांशी उद्धव ठाकरे स्वतः बोलले. त्यामुळे आजच्या बैठकीला उपस्थित आमदारांत उत्साह होता.

Uddhav Thakre welcomes Prof Sharad Patil & his colligues.
शिंदे सरकारकडून मविआचे निर्णय रद्द करण्याच्या धडाक्याने अजित पवार संतापले

पक्षप्रमुख ठाकरे यांनी धुळे शहरातील शिवसेनेचे माजी आमदार मात्र सध्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले प्रा. पाटील यांनाही दुरध्वनी केला होता. त्यामुळे ते आजच्या बैठकीला उपस्थित होते. यावेळी पक्षप्रमुखांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

याबाबत प्रा. पाटील म्हणाले, शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेच सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व माजी कार्यकर्ते या आमदारांबाबत अतिशय नाराज व संतप्त आहेत. पक्षापासून दुर गेलेले लोकही आता पुन्हा शिवसेनेत येत आहेत. अशा स्थितीत आगामी राजकारणाचा विचार करता सामान्य जनतेत बंडखोरांबाबत नाराजी आहे. त्यामुळे मी पुन्हा शिवसेनेत परतलो.

आगामी काळात धुळे शहर व जिल्ह्यात शिवसेनेची बांधनी करण्यात येईल. आम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेऊ. शिवसेनेचा कार्यकर्ता उत्साहाने काम करील. लवकरच धुळे शहर व जिल्ह्यात शिवसेनेच्या विस्तारासाठी लोकांना बरोबर घेऊन आम्ही सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन करू. तळागाळात काम केले जाईल. लोकसभा व विधानसभा निवडणूक डोळ्यापुढे आम्ही नियोजन करणार आहोत, असे प्रा. पाटील म्हणाले.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in