भारत जोडो यात्रेसाठी धुळ्याचे पथक रवाना

धुळे येथून भारत जोडो यात्रेसाठी मंगळवारी विविध पक्ष, संस्था, संघटनेचे पदाधिकारी रवाना झाले.
Congress workers at Dhule
Congress workers at DhuleSarkarnama

धुळे : राष्ट्रीय एकात्मतेसाठी (National integrity) खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभागासाठी जिल्ह्यातील काँग्रेस, (Congress) समविचारी पक्ष, संस्था, संघटनांचे शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी येथून रवाना झाले. त्यांचे स्वागत करीत मान्यवरांनी संबंधितांना निरोप दिला. (Dhule party workers move to join bharat jodo yatra)

Congress workers at Dhule
धक्कादायक; पोलिस निरीक्षक प्रवीण कदम यांची आत्महत्या

यासंदर्भात आमदार कुणाल पाटील यांच्या पुढाकाराने शहर तसेच जिल्ह्यात बैठका घेण्यात आल्या. त्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साही सहभाग होता. महाविकास आघाडीचे घटक पक्ष देखील सहभागी होत आहे. विशेषतः शिवसेनेच्या नेत्यांची सहभाग लक्षणीय आहे.

Congress workers at Dhule
गावित यांनी एकनाथ खडसेंना चक्क मुख्यमंत्रीच केले?

भारत जोडो यात्रा मंगळवारी वाशीम येथे दाखल झाली. प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी येथील एसएसव्हीपी महाविद्यालयातील प्रांगणातून वाशीमकडे रवाना झाले. त्या वेळी भारत जोडो-नफरत छोडो, जोडो-जोडो-भारत जोडो, राहुल गांधी झिंदाबादच्या घोषणांनी परिसर दुमदुमला.

शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष किरण पाटील, रमेश दाणे, हेमंत मदाने, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. अनिल भामरे, भगवान गर्दे, डॉ. दरबारसिंग गिरासे, लहू पाटील, डॉ. एस. टी. पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भगवान पाटील, विशेष कार्य अधिकारी प्रकाश पाटील, पंढरीनाथ पाटील, अरुण पाटील, अशोक सुडके, राजेंद्र भदाणे, एन. डी. पाटील, सोमनाथ पाटील, संतोष राजपूत, डॉ. दत्ता परदेशी, महिला काँग्रेस अध्यक्षा गायत्री जयस्वाल, प्रदीप देसले, आबा गर्दे, गणेश गर्दे, हरिश्चंद्र लोंढे, पोपटराव चौधरी, ॲड. मदन परदेशी, महम्मद जैद, नवल ठाकरे, जमील मन्सुरी, सुभाष काकुस्ते, प्रभाकर खंडारे, दीपकुमार साळवे आदी सहभागी झाले. दरम्यान, आमदार कुणाल पाटील मंगळवारी खासदार राहुल गांधी यांच्यासोबत होते. ते बुधवारी सोबतच असतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in