धुळ्याची शिवसेना प्रतिमा अन् अंतर्गत वादात रूतली!

मुख्यमंत्री, पालकमंत्री लाभूनही अस्तित्वासाठी सुरु आहे धडपड
Uddhav Thakre & Abdull Sattar

Uddhav Thakre & Abdull Sattar

Sarkarnama

निखिल सूर्यवंशी

धुळे : शिवसेनेत (Shivsena) अनपेक्षित उलथापालथ झाली. राज्यात मुख्यमंत्री, (Uddhav Thakre) आणि जिल्ह्यास पालकमंत्री लाभूनही पक्षाला जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष बदलावा लागला. त्याला अंतर्गत वाद कारणीभूत मानला जातो. महापालिकेत (Dhule) गेल्या निवडणुकीत एक जागा वगळता शिवसेनेचे सुपडे साफ झाले. ही पोकळी पक्षाच्या मंत्र्यांमार्फत भरून निघेल असे कुठलेही चिन्ह अद्याप नाही.

<div class="paragraphs"><p>Uddhav Thakre &amp; Abdull Sattar</p></div>
राज्यमंत्री भारती पवार आणि खासदार हेमंत गोडसे विकासासाठी एकत्र!

शिवसेनेला धुळ्यात विधानसभा निवडणुकीत यश मिळू शकले नाही. त्यामुळे कार्यकर्तृत्वातून पुन्हा पक्ष प्रतिमा उंचावणे व संघटन कौशल्याचे शिवधनुष्य पेलण्याचे कसब नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना दाखवावे लागेल. ते आव्हान ते कसे पेलतात हे भविष्यातच कळेल.

शिवसेनेंतर्गत येथील काही तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळात शिवसेना कमकुवत होत चालली होती, व्यक्ती केंद्रित झाल्याची तक्रार वरिष्ठ पातळीवर झाली. त्या तक्रारकर्त्यांना आता त्यांच्या कारकिर्दीत पक्ष बळकट, मजबूत होत असून व्यक्ती केंद्रित नाही, असे दाखवावे लागणार असल्याचा कार्यकर्त्यांचा युक्तिवाद आहे. शिरपूर व शिंदखेडा तालुक्याचे जिल्हाध्यक्ष वगळता धुळे-साक्री तालुक्याचे जिल्हाध्यक्ष बदलण्याची वेळ वरिष्ठांवर आली तेव्हा या पदाची सूत्रे स्वीकारण्यास कुणी तयार नव्हते. पक्षांतर्गत ज्यांची नावे पुढे येत होती, त्यास अन्य गटाकडून विरोध केला जात होता. पक्षाचे मुख्यमंत्री व स्थानिक पातळीवर पालकमंत्री असताना ही स्थिती कार्यकर्त्यांसाठी चिंताजनक ठरली.

<div class="paragraphs"><p>Uddhav Thakre &amp; Abdull Sattar</p></div>
महापौर उद्धव ठाकरेंचे नाही, किमान प्रविण दरेकरांचे तरी ऐकतील का?

अस्तित्वासाठी धडपड

सरतेशेवटी डॉ. तुळशीराम गावित यांच्या रूपाने साक्री मतदारसंघाकडे जिल्हाप्रमुख पद गेले. पाठोपाठ पक्षाने राष्ट्रवादी, भाजपला सोडचिठ्ठी देणारे आक्रमक पठडीतले माजी नगरसेवक मनोज मोरे, सतीश महाले यांच्याकडे महानगरप्रमुख पदाची जबाबदारी सोपविली. त्यांच्यासह सहसंपर्क प्रमुखांवर पक्षाचे काहीसे कमकुवत झालेले महिला संघटन, तसेच विभाग व उपविभाग, गट पातळीवरील ताकद वाढविण्याची मोठी जबाबदारी असेल. विधान सभेपाठोपाठ जिल्ह्यातील गेल्या पालिका, महापालिका निवडणुकीतही टिकाव लागला नसल्याने शिवसेनेला आजही राज्यात सत्तेत असताना येथे अस्तित्वासाठी धडपड करावी लागत असल्याचे चित्र आहे.

पक्षापुढे हे आहेत प्रश्‍न...

गत वर्षात खांदेपालट झाल्यानंतरही पक्षांतर्गत आता एकमेकांविषयी गैरसमज पसरविण्याचे प्रकार, वरिष्ठांपर्यंत वस्तुस्थिती मांडण्याऐवजी आभासी प्रतिमा तयार करणे, एकमेकांविषयी कान भरणे, होतकरू कार्यकर्त्यांना सोबत घेण्याऐवजी त्यांचा सहभाग टाळणे, कुठले सक्रिय पदाधिकारी अलीकडे बॅक फूटवर आहेत व त्याची कारणे काय, तक्रारकर्त्या शिवसैनिकांनी वेळोवेळी वरिष्ठ पातळीवर जी स्थिती मांडली ती खरी होती किंवा नाही याची पुर्नचौकशी करणे, तसेच जुने- जाणते शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांचा मानपान राखला जातो किंवा नाही, त्यांना दूर ठेवणे हिताचे आहे किंवा नाही यासह विविध प्रश्‍नांची उकल वरिष्ठांना करावी लागेल, असे कार्यकर्त्यांना मनोमनी वाटते. आगामी विविध निवडणुका लढवायच्या असतील, त्यासाठी पक्ष प्रतिमा उंचवायची असेल तर अंतर्गत वादाला तिलांजली द्यावी लागेल, अशीही त्यांची भावना आहे. ती नवनियुक्त पदाधिकारी व वरिष्ठ कसे जाणून घेतात यावर शिवसेनेची शहर व जिल्ह्यातील भविष्याची वाटचाल अवलंबून असेल.

चांगली संधी गमावल्याचा सूर

नुकत्याच झालेल्या मनपा प्रभाग पाचच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने नवखा चेहऱ्याचा उमेदवार दिला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आणि काही योजनांवरून शहरात भाजपविरोधात नाराजीचा सूर असतानाही तो कॅच करण्यात शिवसेना कमी पडली. शिवाय शिवसेनेला काँग्रेस व राष्ट्रवादीच्या बळाचा वापर करून घेता आला नाही. प्रभाग पाचला परिणामकारक ताकदीनिशी शिवसेना रिंगणात उतरली असती तर त्याचा मोठा लाभ आगामी कालावधीत पक्षाला दिसून आला असता. मात्र, ही चांगली संधी शिवसेनेने गमावल्याचे जाणकारही सांगतात.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com