अडचणीत आलेल्या नारायण राणेंची अटक पुन्हा टळली

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना पोलिसांनी मागील वर्षी अटक केली होती.
अडचणीत आलेल्या नारायण राणेंची अटक पुन्हा टळली
Narayan Rane Latest News in MarathiSarkarnama

धुळे : जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना पोलिसांनी मागील वर्षी अटक केली होती. या प्रकरणी धुळ्यातही राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात राणेंवर अटकेची टांगती तलवार होती. या प्रकरणी राणेंना न्यायालयाने दिलासा दिला असून, त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. (Narayan Rane Latest News in Marathi)

धुळ्यामध्ये राणेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे हे प्रकरण आहे. या प्रकरणी राणेंवर कारवाई होण्याची शक्यता होती. त्याआधीच राणेंनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने या प्रकरणी राणेंना अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळाला होती. उच्च न्यायालयाने त्यांना दोन आठवडे कारवाईपासून संरक्षण दिलं होतं. आता सत्र न्यायालयानंही राणेंना दिलासा दिला आहे.

Narayan Rane Latest News in Marathi
राज ठाकरे येतील तेव्हाच पक्ष कार्यालयात जाणार! नाराज वसंत मोरेंचा निर्धार

यानंतर राणेंच्या वतीनं वकील अनिकेत निकम यांनी धुळे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. या अर्जाला पोलिसांना विरोध केला. मात्र, न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. यावर बाजू मांडताना वकील निकम म्हणाले की, राणेंनी कोणताही कायदा हातात घेतलेला नाही. त्यांनी कोणत्याही गटाला अथवा वर्गाला चिथावणी दिलेली नाही. राज्य सरकारने राणेंच्या विरोधात एकाच प्रकारच्या एफआयआर वेगवेगळ्या ठिकाणी दाखल केल्या आहेत. मात्र, प्रत्येक ठिकाणची कलमे वेगळी असून, यात राजकीय हेतू दिसत आहे. राणे हे केंद्रीय मंत्री असून, ते फरार होण्याची भीती नाही. पोलिसांनी त्यांना अद्याप चौकशीसाठी बोलावलेले नाही. त्यामुळे त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करावा.

Narayan Rane Latest News in Marathi
काँग्रेसवर नाराज असलेल्या हार्दिक पटेलांवर भाजपचं सरकार झालं मेहरबान!

राणे यांना मागील वर्षी 24 ऑगस्टला रत्नागिरी पोलिसांनी अटक केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राणे यांच्यावर पुणे व नाशिकमध्येही गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात त्यावेळी न्यायालयानं जामीन मंजूर केल्यानंतर राणे यांनी थेट राज्य सरकारला इशारा दिला होता. राज्य सरकारवर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.