Dhule News; माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्यावर जमीन खरेदी- विक्रीत हेराफेरीचा गुन्हा?

धुळे येथे व्यापाऱ्याची कोट्यावधींच्या फसवणूक प्रकरणी दोंडाईचात सहा जणांविरुद्ध गुन्हा
Dr. Hemant Deshmukh
Dr. Hemant DeshmukhSarkarnama

धुळे : (Dhule) जमीन खरेदी- विक्रीच्या (Land scam) व्यवहारात हेराफेरी करीत व्यापाऱ्याची सव्वाकोटीत फसवणूक केली. या प्रकरणी माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख (Dr. Hemant Deshmukh) यांच्यासह सहा संशयितांविरुद्ध दोंडाईचा (ता. शिंदखेडा) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. (Land scam in Nandurbar with traders complain in Police)

Dr. Hemant Deshmukh
Crime News : राजकीय पक्षाची पदाधिकारी असल्याचे भासवत खंडणी मागणारी महिला पोलिसांच्या जाळ्यात

नंदुरबार येथील व्यापारी शेख फारुक शेख नजीर (रा. प्लॉट क्रमांक ७, गांधीनगर, नंदुरबार) यांनी दोंडाईचा पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार २६ मे २०२२ ते १९ ऑक्टोबर २०२२ दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला.

Dr. Hemant Deshmukh
Mahadev Jankar : ...तर मी डॉक्टर झालो असतो; महादेव जानकरांनी सांगितला किस्सा अन् उपस्थित झाले अचंबित

दोंडाईचा शहरातील सर्व्हे नं ५६/१ वरील १६ हजार चौमी जमिनीचे मूळ मालक डॉ. हेमंत देशमुख (रा. दोंडाईचा), राजेंद्र विष्णू इंगळे (रा. धुळे), अंबादास कन्हय्यालाल मराठे (रा. दोंडाईचा) तसेच, रवींद्र देशमुख (रा. दोंडाईचा) यांनी मिळकत सर्व्हे नंबर ५६/९ ही व्यापारी शेख फारुक यांना विक्री केली. त्यांच्या नावे खरेदीखत करून देण्याबाबत फिर्यादी शेख यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून १६ लाख रोख व एक कोटी चार लाख बँक खात्याद्वारे, असे एकूण एक कोटी वीस लाख रुपये स्वीकारले. मिळकतीचा खरेदी- विक्रीचा व्यवहार व्यापारी शेख फारुक यांच्याशी झाला असल्याचे माहीत असूनही मिळकत ही संशयित राजेंद्र इंगळे हा संपूर्ण खरेदीखतातील संमतीदार असे दर्शवून खोट्या व बनावट खरेदी सौदा पावत्या तयार केल्या.

अनिल चंपालाल पारख व गणेशमल भुरमल बंब (दोघे रा. दोंडाईचा) यांच्याशी संगनमताने कटकारस्थान रचले. त्यांच्याकडून पैसे स्वीकारून त्यांच्याशी करार करून तसे १९ ऑक्टोबर २०२२ ला रजिस्टर खरेदीखत करून देऊन व घेऊन व्यापारी शेख यांचा विश्वासघात केला. तसेच, त्यांची आर्थिक फसवणूक केली, अशी तक्रार झाली. याबाबत व्यापारी शेख यांनी दहा जानेवारीला दोंडाईचा पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. चौकशीअंती डॉ. देशमुख, राजेंद्र इंगळे, अंबादास मराठे, रवींद्र देशमुख, अनिल पारख, गणेशमल बंब यांच्याविरूद्ध दोंडाईचा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी तपास करीत आहेत.

माझा संबंध नाही : देशमुख

या प्रकरणी माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले, दोंडाईचात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्याशी माझा दुरानव्ये संबंध नाही. मी या आधीच दोंडाईचा पोलिस ठाण्यात संबंधित व्यक्तीच्या विरोधात माझी बेअब्रू केल्याची तक्रार दाखल केली आहे. मी जमिनीचा व्यवहार ज्या व्यक्तीशी केला ती व्यक्ती आणि फिर्यादीमध्ये व्यवहार बिनसला आहे. यात माझा कुठेही संबंध येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com