महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी ‘आओ-जाओ...घर तुम्हारा’

धुळे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर लेटलतिफ कर्मचाऱ्यांची उपमहापौर अनिल नागमोते, उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर यांनी झाडाझडती घेतली.
Dy. Com. at Dhule Municiple corporation
Dy. Com. at Dhule Municiple corporationSarkarnama

धुळे : महापालिका (Dhule) उपायुक्तांसह उपमहापौरांनी गुरुवारी अचानक महापालिकेच्या प्रवेशद्वारातच ठाण मांडून अधिकारी, कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. यात ‘आओ जाओ- घर तुम्हारा’ अशी स्थिती करणारे तब्बल ७२ लेटलतिफ कर्मचारी (late comer employees) आढळले. लेटलतिफ कर्मचाऱ्यांच्या या कार्यपद्धतीवर उपमहापौरांसह उपायुक्तांनी संताप व्यक्त करत त्यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाईचा इशारा दिला. (Dy Mayor & Dy Commissioner sit at entrance check the employee presence)

Dy. Com. at Dhule Municiple corporation
एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून भाजपने बाजार समित्यांची विधानसभा केली!

अर्थात असे अनेक प्रसंग झेलणाऱ्या महापालिकेतील महाभागांना याचा काही फरक पडेल की नाही, हे सांगणे कठीण आहे. मात्र, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अशी झाडाझडती घेत राहावी, अशा भावना प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून उमटली. महापालिकेत अधिकारी-कर्मचारी जागेवर नसतात. परिणामी, विविध कामांसाठी महापालिकेत आलेल्या नागरिकांना चकरा माराव्या लागतात, अशा तक्रारी नागरिकांकडून आल्याने उपमहापौर अनिल नागमोते यांनी गुरुवारी महापालिका प्रवेशद्वारातच लेटलतिफ कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेण्याचे ठरविले. याबाबत त्यांनी आयुक्त देविदास टेकाळे व उपायुक्त डॉ. संगीता नांदूरकर यांना कल्पना देत ‘सकाळी दहापूर्वी कार्यालयात या’, असा संदेश दिला होता.

Dy. Com. at Dhule Municiple corporation
सत्तांतरानंतरही नाशिकमध्ये भुजबळांचेच ग्लॅमर अन् रुबाब!

महापालिका कर्मचाऱ्यांची कार्यालयीन वेळ सकाळी पावणेदहा ते सायंकाळी पावणेसहा, अशी आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सकाळी पावणेदहाला महापालिकेत हजर असणे आवश्‍यक आहे. उपमहापौर नागमोते व उपायुक्त श्रीमती डॉ. नांदूरकर यांनी सकाळी सव्वादहाला महापालिकेचे प्रवेशद्वार बंद केले. त्यामुळे उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची पंचाईत झाली. जे कर्मचारी उशिरा येत होते, त्यांची प्रवेशद्वारातच झाडाझडती सुरू झाली. या कार्यवाहीत तब्बल ७२ कर्मचारी लेटलतिफ असल्याचे आढळून आले. साधारण प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांचा यात समावेश होता. उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हजेरीपत्रकावर लेटमार्कचा शेरा देण्यात येईल. त्यांना नोटिसा देऊन कठोर कारवाई केली जाईल, असे उपायुक्त श्रीमती डॉ. नांदूरकर म्हणाल्या. हजेरी दप्तरांची तपासणीत विद्युत विभाग, नगररचना विभागातील दोन कर्मचाऱ्यांनी विभाग प्रमुखांच्या स्वाक्षरीविनाच रजेचा अर्ज केवळ नावाला ठेवून दिल्याचे आढळून आले. उपायुक्त श्रीमती डॉ. नांदूरकर यांनी या कार्यपद्धतीबद्दल संताप व्यक्त केला.

आयुक्तही ‘लेट’च

महापालिकेत अनेक कर्मचारी वेळेवर येत नाहीत. त्यामुळे नागरिकांची कामे होत नाही. त्यांना वारंवार महापालिकेत चकरा माराव्या लागतात. या तक्रारींमुळेच कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतल्याचे उपमहापौर नागमोते म्हणाले. याबाबत आयुक्तांनाही ‘सकाळी दहापूर्वी महापालिकेत या’, असे सांगितले होते. मात्र, आयुक्त टेकाळे हेच सुमारे अर्धातास उशिरा महापालिकेत दाखल झाले, असे म्हणत श्री. नागमोते यांनी नाराजी व्यक्त केली. कारचालक उशीरा आल्याने मनपात उशीरा पोचलो, असा खुलासा आयुक्तांनी केला.

---

विभागनिहाय लेटलतिफ असे

विरोधी पक्षनेता कार्यालय-३, आस्थापना विभाग-१८, लेखा विभाग-२, नगररचना-११, लेखापरीक्षण-१, विद्युत-५, टपाल-३, पाणीपुरवठा-१, बांधकाम-१४, मालमत्ता कर-१४.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com