धुळ्याचे १३ डॉक्टर जळगावने पळविले!

हिरे गर्व्हमेंट मेडिकलसह जिल्हा सर्वोपचार रूग्णालयाच्या सेवेला अ़डसर
Doctors
DoctorsSarkarnama

धुळे : रिक्त पदे भरण्याऐवजी वैद्यकीय (Medical Education) शिक्षण व संशोधन विभागाने येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Dhule) व संलग्न जिल्हा सर्वोपचार रूग्णालयातील १३ आणि नंदुरबार महाविद्यालयाच्या एक अशा १४ डॉक्टरांची जळगाव वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात प्रतिनियुक्तीवर पदस्थापना केली आहे. या निर्णयाबाबत धुळ्यामध्ये नाराजीचा सूर आहे.

Doctors
इच्छुक म्हणतात, भाजप-मनसे युती हाच पर्याय!

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगामार्फत होणाऱ्या निरिक्षणासाठी अध्यापकांची प्रतिनियुक्ती करण्याचा प्रस्ताव होता. त्यानुसार वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने येथील हिरे महाविद्यालय व नंदुरबार येथील एका सहयोगी प्राध्यापक डॉक्टरांची जळगाव येथे प्रतिनियुक्तीवर बदली केली आहे.

Doctors
आर्थिक विषमता हटविण्याची क्षमता केवळ सहकारात!

जळगाव व नंदुरबार येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाल्याने तेथील शासकीय सोपस्कार पार पाडण्यासाठी हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी प्राध्यापकांना वेळोवेळी प्रतिनियुक्तीवर पाठविले जात असल्याने येथील जिल्हा सर्वोपचार रूग्णालयातील सेवेला अडसर निर्माण होतो. यंदाही तीच स्थिती आहे. हिरे महाविद्यालयात ८० सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक डॉक्टर आहेत. पैकी निम्मे नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखविण्यात आले आहेत. त्यात पुन्हा १३ डॉक्टर आता जळगावने पळविले आहेत.

डॉ. बोर्डेंची आज निवृत्ती...पण

डॉ. अनंत बोर्डे शनिवारी निवृत्त होत आहेत. तरीही त्यांची जळगाव येथे प्रतिनियुक्तीवर पदस्थापना दर्शविली आहे. शिवाय त्यांना वर्षभर जळगाव येथे कार्यरत राहावे लागेल, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाने दिले आहेत.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com