धुळे बँक निवडणूक: शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी विजयी

धुळे बँक; बिनविरोधचे स्वप्न भंग करणारे पोपटराव सोनवणेंच्या मुलाटा धक्कादायक पराभव
धुळे बँक निवडणूक: शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी विजयी
Chandrakant Raghuwanshi & Harshwardhan DahiteSarkarnama

धुळे : धुळे- नंदूरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी सुरु झाली. किसान विकास पॅनेलचे नेते व शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuwanshi) विजयी झाली. आतापर्यंतच्या निकालात किसान संघर्ष पॅनेलच्या तीन तर शेतकरी विकासचे दोन उमेदवार विजयी झाली आहेत.

Chandrakant Raghuwanshi & Harshwardhan Dahite
धुळे बँक निवडणूक; `शेतकरी` व `किसान`ने प्रत्येकी २ जागा जिंकल्याने चुरस वाढली

दरम्यान या निवडणुकीत बिनविरोधला सुरुंग लावणारे साक्री तालुक्यातील जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पोपटराव सोनवणे यांचे चिरंजीव अक्षय पराभूत झाले. येथे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांचे चिरंजीव हर्षवर्धन दहिते ५२ मतांनी विजयी झाले.

Chandrakant Raghuwanshi & Harshwardhan Dahite
देवेंद्र फडणवीस यांचे संकेत, एस. टी. कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण अशक्य

यामध्ये सर्वपक्षीय शेतकरी विकास व चंद्रकांत रघुवंशी (Chandrakant Raghuwanshi) यांच्या नेतृत्वाखालील किसान विकासने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या. त्यामुळे आमदार अमरीशभाई पटेल (DCC Bank) यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलचा गवगवा असली तरीही किसान संघर्ष पॅनेलने देखील आव्हान दिल्याचे चित्र आहे. आज सकाळी मतमोजणीस प्रारंभ झाला. बँकेच्या सतरा जागांपैकी सात जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. दहा जागांसाठी वीस उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे शेतकरी विकास आणि किसान संघर्ष या पॅनेलमध्ये सरळ लढत आहे. त्यात सुरवातीला दहा पैकी चार जागांचे निकाल जाहीर झाले. यामध्ये दोन जागा महाविकास आघाडीच्या किसान संघर्ष पॅनलला तर दोन जागांवर भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले.

भाजप पुरस्कृत सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनल तर्फे हर्षवर्धन दहिते व राजेंद्र देसले यांचा विजय तर महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनल मधून चंद्रकांत रघुवंशी व संदीप वळवी यांचा विजय झाला. या निवडणुकीदरम्यान सर्वपक्षीय शेतकरी विकास पॅनलतर्फे ही निवडणूक बिनविरोध करण्याचं स्वप्न भंग करणार्‍या साक्री येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पोपटराव सोनवणे यांच्या मुलाचा अक्षय पोपटराव सोनवणे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे.

...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in