Dhule Bazar Samiti Results : धुळ्याच्या दोंडाईत शत-प्रतिशत भाजपा; आमदार रावलांचा करिश्मा..

Jaykumar Rawal News : दोन जागा बिनविरोध भाजपने जिंकल्या...
Dhule Bazar Samiti Results : Jaykumar Rawal News
Dhule Bazar Samiti Results : Jaykumar Rawal NewsSarkarnama

Dhule Bazar Samiti Results : धुळे जिल्ह्यातील दोंडई कृषी उत्पन्न बाजार समितीवर भारतीय जनता पार्टीची (BJP) सरशी झाली आहे. या निवडणुकीत भाजपचा झेंडा फडकला आहे. बाजार समितीच्या एकूण १८ जागा होत्या. या सर्वच्या सर्व १८ जागांवर भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. यामुळे या ठिकाणी भाजपने निर्विवाद वर्चस्व राखले आहे.

Dhule Bazar Samiti Results : Jaykumar Rawal News
Bazar Samiti Result : मंचरमध्ये वळसे पाटलांना दे धक्का : राष्ट्रवादीचे बंडखोर निकम विजयी, सत्ता मात्र महाविकास आघाडीची

या निवडणुकीत दोन जागा आधीच बिनविरोध भाजपने जिंकल्या होत्या. एकूण १६ जागांसाठी मतदान पार झाले होते. या सर्व जागांवर भाजपचा निर्भेळ यश संपादन केले आहे. माजी मंत्री व आमदार जयकुमार रावल यांनी या निवडणुकीत पुन्हा एकदा आपला करिश्मा दाखवला आहे. या दिमाखदार विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत आनंद साजरा केला.

Dhule Bazar Samiti Results : Jaykumar Rawal News
Karjat Bazar Samiti Results: राम शिंदे-रोहित पवारांमध्ये मोठी चुरस: दोन्ही गटाला समान जागा; फेर मतमोजणी सुरू

राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.28 एप्रिल) मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. यामध्ये दोंडाई बाजार समितीत भाजपला मिळालेलं यश मोठा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com