
Dhule APMC Election : धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील निवडणूक ही भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी होत असली तरी यात प्रामुख्याने लढत खासदार डॉ. सुभाष भामरे विरुद्ध आमदार कुणाल पाटील यांच्यात होणार आहे हे आता स्पष्ट झाले आहे.
यामुळे यंदा या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. या निवडणुकीत सुभाष भामरे आणि काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतमोजणीमध्ये पहिले कल महाविकास आघाडीच्या बाजूने येत आहे. महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार असे दिसते.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत यंदा प्रथमच भाजप पुरस्कृत पॅनलने उडी घेतली आहे. काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलची गेल्या २५ वर्षांपासूनची असलेली सत्ता उलथून टाकण्याचा निश्चय भाजपने केला आहे.
चाळीसगाव बाजार समितीत भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगेश चव्हाण यांनी विरोधकांना धुळ चारली आहे. १८ पैकी १५ जागावर आघाडी मिळवून आपले वर्चस्व दाखविले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार राजीव देशमुख यांना हा धक्का मानला जात आहे.
समितीत १८ जागापैकी तब्बल पंधरा जागावर भारतीय जनता पक्ष प्रणित युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. केवळ तीन जागावर महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार मंगेश चव्हाण जिल्हा दूध संघाचे चेअरमन आहेत. बाजार समितीतील या यशामुळे त्यांचे सहकार क्षेत्राततही वरचष्मा असल्याचे दिसून आले आहे.
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपचे विद्यमान आमदार डॉ. राहुल आहेर यांना काँग्रेसचे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांच्या लोकमान्य परिवर्तन पॅनलने धक्का देत बाजार समितीमध्ये परिवर्तन घडवले. कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने दहा जागा जिंकल्या.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.