पालकमंत्री के. सी. पाडवींना होम पीचवर शिवसेनेचा राजकीय झटका!

या निवडणूकीत दहा जागांसाठी मतादन झाले होते.
पालकमंत्री के. सी. पाडवींना होम पीचवर शिवसेनेचा  राजकीय झटका!
Chandrakant Raghuvanshi & K. C. PadviSarkarnama

नंदुरबार : धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज लागला. यामध्ये अक्कलकुवा तालुका गटातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी (Amsha Padvi_ बिनविरोध निवडून आले. अन्य गटातून देखील शिवसेनेला चांगले यश मिळाले. त्यामुळे पालकमंत्री व काँग्रेस नेते. के. सी. पाडवी (K. C. Padvi) यांना शिवसेनेने मोठा झटका दिला.

Chandrakant Raghuvanshi & K. C. Padvi
नगरसेविका संगीता गायकवाड यांनी केली नाशिक ते पंढरपूर सायकल वारी!

या निवडणूकीत दहा जागांसाठी मतादन झाले. यामध्ये सात जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी बिनविरोध निवडून आले. धडगावमधून संदीप मोहन वळवी हे मोठ्या फरकाने विजयी झाले. राज्याचे आदिवासी विकास मंत्री व नंदुरबारचे पालकमंत्री के. सी. पाडवी यांच्या अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील दोन्ही ठिकाणी शिवसेनेने विजय मिळवला. या विजयाने शिवसेनेने पालकमंत्र्यांना राजकीय झटका दिला.

Chandrakant Raghuvanshi & K. C. Padvi
महाविकास आघाडीचा कारभार म्हणजे ‘फसवणुकीची दोन वर्षे’

नंदूरबार जिल्ह्यातील सात जागांवर मतदान झालेल्या गटांतील विजयी उमेदवार असे, भारतीय जनता पक्षाचे महंत दर्यावीर दौलतगीर, जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे यांच्या पत्नी सौ. सीमा रंधे विजयी झाल्या. अन्य विजयी उमेदवारांत कंसात मताधिक्य, हर्षवर्धन दहिते (५० मते), राजेंद्र देसले (६० मते), शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (५९ मते), अमरसिंग गावीत (१३ मते) , संदीप वळवी (१० मते).

धुळे जिल्ह्यातून शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन नुकतेच काँग्रेस पक्षात दाखल झालेले व सध्या काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रा. शरद पाटील १२१ मतांनी विजयी झाली. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे माजी राज्यमंत्री, खासदार डॅा सुभाष भामरे यांचे बंधू सुरेश रामराव भामरे यांचा पराभव केला. धुळे येथन राजवर्धन कदमबांडे १३० मते मिळवून विजयी झाले. त्याच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला केवळ सात मते मिळाल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान या निवडणुकीत बिनविरोधला सुरुंग लावणारे साक्री तालुक्यातील जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे पोपटराव सोनवणे यांचे चिरंजीव अक्षय पराभूत झाले. येथे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांचे चिरंजीव हर्षवर्धन दहिते ५२ मतांनी विजयी झाले.

...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in