शिवसेनेचे धरणगावचे पदाधिकारी बंडखोर गुलाबराव पाटील यांच्या गटात

शहरप्रमुखांसह पदाधिकारी राजीनामे देऊन गुलाबराव पाटील यांची सोबत करणार.
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama

धरणगाव : धरणगाव (Jalgaon) तालुक्यातील शिवसेनेचे (Shivsena) उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, युवा सेनेचे शहरप्रमुख व तालुकाप्रमुखांसह असंख्य कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. बंडखोर आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांच्यासोबत राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश करून आमदार गुलाबराव पाटील यांनी घेतलेल्या निर्णयास पाठिंबा दर्शविला आहे. (Local Shivsena leaders support rebel Gulabrao Patil`s Decision)

Gulabrao Patil
दादा भुसे यांनी उद्धव ठाकरेंपुढे अन्नाची शपथ घेतली, अन् गद्दारी केली..

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे धरणगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, धरणगाव शिवसेना शहरप्रमुख राजू महाजन यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता. त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांत संभर्म होता. या नेत्यांनी अन्य पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून त्यांचे मतपरिवर्तन करीत त्यांना गुलाबराव पाटील यांच्या गटात सामील केल्याचे बोलले जाते.

Gulabrao Patil
निसर्ग भरभरून पाऊस दिला...व्यवस्था मात्र कर्मदरिद्री...

शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, पाळधी येथील युवा शहरप्रमुख आबा महाजन, युवा सेनेचे धरणगाव तालुकाप्रमुख बंटी पाटील व बोरगावचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नितीन पाटील यांनी असंख्य पदाधिकाऱ्यांसह आज राजीनामे दिले. जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याकडे हे सर्व राजीनामे पाठविण्यात आले आहेत. या सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे.

शिवसेना वाचविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आम्ही निर्णय घेतला आहे. आम्ही शिवसेनेतच आहोत याची खात्री शिवसैनिकांना झाली आहे, त्यामुळे ते आमच्यासोबत आले आहेत. ज्यांना आमची भूमिका पटणार आहे असे अनेकजण भविष्यात आमच्यासोबत येतील.

- गुलाबराव पाटील, आमदार, शिवसेना, जळगाव ग्रामीण

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in