धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करावे!

एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात वेगळे चित्र असते असा दावा केला.
Eknath Khadse, NCP Leader
Eknath Khadse, NCP LeaderSarkarnama

जळगाव : (कै.) गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) आज हयात असते तर महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकीय चित्र वेगळे असते. गेल्या पाच सात वर्षात जे तुम्हाला आम्हाला जे अनुभवायला मिळाले, ते मिळाले नसते. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची अधिक प्रगती झाली असती. धनंजय मुंडे (Dhanajay Munde) हे गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी सांगितले.

Eknath Khadse, NCP Leader
राजमाता कल्पनाराजे भोसलेंनी दिली नरहरी झिरवाळांना कौतुकाची थाप!

जळगाव शहरातील मेहरूण परिसरात लोकनेते (स्व.) गोपीनाथराव मुंडे प्रवेशद्वाराचे भूमिपूजन मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. या वेळी माजी मंत्री एकनाथ खडसे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, महापौर जयश्री महाजन आदी उपस्थित होते.

Eknath Khadse, NCP Leader
अजित पवारांनी नाशिकच्या भाजपचा करेक्ट कार्यक्रम केला!

श्री. खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कामकाज व नेतृत्वाचे अनुभव माडंले. ते म्हणाले, त्यांनी रक्ताचं पाणी केलं आणि हा बहुजन समाज, छोटे, मोठे समाज त्यांनी भाजपमध्ये आणले. वंजारी समाज असेल, धनगर समाज असेल, माळी, कोळी, साळी, लेवा पाटील असेल काय असतील नसतील ते मुस्लीम, मागासवर्गीय सगळे समाज त्यांनी पक्षात आणले. पक्षाचा चेहरा बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि बहुजनांचा पक्ष म्हणून त्या कालखंडात भारतीय जनता पक्षाची ओळख झाली.

मुंडे यांनी विविध समाज घटकांना एकत्र केल्याची माहिती खडसे यांनी दिली. ते म्हणाले, (कै) मुंडे त्यांनी राज्यात शिवसेना, भाजप युतीचे सरकार सत्तेत आल्यावर मंत्रीमंडळात आम्ही काम करीत असताना त्यांनी `माधव` म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी अशा स्वरूपाचा प्रयोग करून अन्य बारके बारके समाज त्या खाली संघटीत करण्याचे प्रयत्न केले. महाराष्ट्रात पहिल्यांदा त्यांच्या प्रयत्नामुळे वंजारी समाजाला तीन टक्के आरक्षण मिळाले. एनटी, व्हीजेएनटी, डीटीएनटी हे घटक प्राधान्याने नोकरीत घेतले गेले. हे केवळ मुंडे साहेबांमुळेच शक्य झाले.

ते पुढे म्हणाले, श्री. मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढल्यामुळे राज्यात सरकार आले. पुढे जे काम केले त्याने पक्षाचा विस्तार झाला. हे स्वरूप विस्तारत असताना त्यांनी धनंजय मुंडे यांना राजकारणात आणले. राजकारणात त्यांचा वारस म्हणून धनंजय मुंडे यांना पुढे आणले. धनंजय मुंडे यांनी साऱ्या समाजांना बरोबर घेऊन काम करीत हा वारसा सिद्ध केला. राजकारणात आणि व्यक्तीगत कामकाजातून त्यांनी ते केले.

जळगावला इथे लाड वंजारी समाजाचे मंगल कार्यालय आहे. ते कधीही लाड वंजारी समाजाचे झाले नसते. मुंडे साहेबांच्या प्रयत्नातून त्या जमिनीचे आरक्षण आम्ही उठवले. त्यात बदल केला. ती जागा लाड वंजारी समाजाला मिळाली व हे भव्य मंगल कार्यालय उभे राहिले. त्यांनी काम करताना आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिले. धनंजय मुंडे सारखा एक युवा कार्यकर्ता त्यांच्या मार्गावर वाटचाल करीत पुढे आणला. धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या सारखेच महाराष्ट्राचे, सर्व समाजांचे नेतृत्व करावे अशी अपेक्षा खडसे यांनी व्यक्त केला.

....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com