Samruddhi news : `समृद्धी` महामार्गावरील अपघात रोखण्यास सापडला `हा` उपाय!

महासंचालक डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या पुढाकाराने “रोड हिप्नोसिस “ मुळे होणाऱ्या अपघातांवर केले जाणार महत्त्वाचे बदल.
ADG Ravindra Singhal (IPS)
ADG Ravindra Singhal (IPS)Sarkarnama

Samruddhi Accidents news : समृद्धी महामार्गावर होणाऱ्या अपघातांचे प्रमुख कारण पुढे आले आहे. त्याबाबत नव्याने पदभार स्विकारलेले अतिरीक्त महासंचालक डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांनी संमोहन तज्ञांच्या मदतीने त्यावर उपाय शोधले आहेत. त्यानुसार आता या महामार्गावर सचित्र फलक आणि वैविध्यपूर्ण झाडे लावली जाणार आहेत. (Various types of tree plantation & Boards with Picture will be plant)

राज्यातील (Maharashtra) बहुचर्चीत समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) वेगवान वाहतूक होते. त्यात नियंत्रण सुटून होणारे अपघात वाढत आहेत. त्यामागे रोड हिप्नोसिस हे कारण असल्याचे संमोहन तज्ञांचे मत आहे. त्यावर प्रभावी उपाय पोलिसांकडून (Police) केले जाणार आहेत.

ADG Ravindra Singhal (IPS)
Sharad Pawar On Ajitdada :अजित पवार भाजपसोबत जाण्याच्या चर्चेवर शरद पवारांनी स्पष्टच सांगून टाकले.....

या महामार्गावर अडथळेमुक्त गतीमान प्रवासाच्या उद्देशाने बनविलेला समृद्धी महामार्ग मागील काही महिन्यांपासून वाढत्या अपघातांमुळे चर्चेत आलाय. या वाढत्या अपघातांच्या अनेक कारणांपैकी “रोड हिप्नोसिस “ हे एक महत्त्वाचे कारण पुढे आले आहे.

“ रोड हिप्नोसिस “ समजून घेण्याआधी “ हिप्नोसिस “ म्हणजे नेमकं काय आणि ते घडते कसे हे समजून घेणे गरजेचे आहे. हिप्नोटिक ट्रान्स किंवा समोहनावस्था म्हणजे आपले तर्कवितर्क करू शकणारे बाह्यमन किंवा जागृत मन निष्क्रिय होणे किंवा झोपी जाणे. रोज नैसर्गिक झोपेत हेच घडत असते.

ADG Ravindra Singhal (IPS)
ACB Trap News : गुरुवारी आमदार मिर्झांची चौकशी आणि शुक्रवारी शेजवळांवर ट्रॅप, योगायोग की आणखी काही ?

संमोहन प्रक्रियेत हे जाणीवपूर्वक घडविले जाते. ते कसे केले जाते ते समजून घेऊया. सामान्यतः जागेपणात जागृत मन आपल्या पंचज्ञानेंद्रियांद्वारा येणाऱ्या माहितीला सतत तर्कवितर्क करून अंतर्मनात पाठवत असते. म्हणून अंतर्मनावर एक प्रकारे जागृत मनाचे नियंत्रण राहते. परंतु जर जागृत मनाकडे एकाच प्रकारची सूचना किंवा माहिती परतपरत येत राहिली किंवा ती जर एकसूरी राहिली तर त्याच त्याच माहिती किंवा सूचनेवर जागृत मन तर्कवितर्क करणे सोडून देते आणि ते निष्रिय व्हायला लागते.

फॉर्मल हिप्नोसिस प्रक्रियेत संमोहनकर्ता संबंधित व्यक्तीला तिचे अवधान किंवा लक्ष एका विशिष्ट बिंदूवर / वस्तूवर केंद्रित करायला लावतो व मौखिक सूचना देतांना सुद्धा एकच सूचना पून्हा पून्हा एकसूरी आवाजात रिपीट करतो, ज्यामुळे व्यक्तीचे जागृत मन निष्क्रिय होऊन व्यक्ती संमोहनावस्थेत जाते.

ADG Ravindra Singhal (IPS)
Suhas Kande News : आमदार सुहास कांदे यांच्याकडे मागितली ५ लाखांची खंडणी?

आता समृद्धी महामार्गावर होणारे रोड हिप्नोसिस कसे घडते हे समजणे सोपे होईल. महामार्गावर प्रवास करतांना दूरदूर पर्यंत डोळ्यांना पर्यायाने जागृतमनाला एकसूरी पणा दिसत राहतो. शिवाय रस्त्यावर असणारे पांढरे पट्टे या एकसूरी पणात भर टाकतात. जागृतमनाला जागे राहण्यासाठी चालना मिळणारी विविधता कुठेही दिसत नाही, त्यामुळे ते क्षीण किंवा निष्क्रिय होऊन चालकाला संमोहनावस्था येते आणि त्या ट्रान्समध्ये गाडीवरचे नियंत्रण सुटून अपघात होतात.

समृद्धी किंवा इतर कोणत्याही लांब पल्ल्यावर होणाऱ्या रोड हिप्नोसिसला कारणीभूत असलेल्या एकसूरी पॅटर्नला खंडीत करण्यासाठी काही योजना केल्यास अपघात टाळता येऊ शकतील. जसे रस्त्याच्या कडेला अंतराअंतरावर झाडे लावणे. ती सुद्धा एकाच प्रकारची नको, विविध प्रकारची, वेगवेगळ्या आकाराची असावीत. त्यामुळे चालकाला गाडी चालवतांना वेगवेगळे दृश्य दिसून जागेपणासाठी चालना मिळत राहील. आपण जेव्हा जंगलात किंवा घाटात गाडी चालवतो तेव्हा प्रवासातील समोर येणारे वेगळेपण प्रवास आनंदी आणि सजग ठेवतो. शिवाय अजून एक उपाय करता येईल. महामार्गावर ठराविक अंतराने जागृतमनाला चालना देणारे सचित्र बोर्ड्स लावले तरी प्रवासाचा एकसूरीपणा घालवायला मोठी मदत होईल.

ADG Ravindra Singhal (IPS)
Sharad Pawar : अजित पवारांबाबत गैरसमज पसरविले जातात; पवारांकडून पाठराखण

रोड हिप्नोसिसमध्ये अप्रत्यक्ष भर टाकणाऱ्या अजून काही गोष्टी कटाक्षाने टाळायला हव्यात. झोप पूर्ण न करता गाडी चालवणे किंवा नैसर्गिक झोपेचा आवेग जेव्हा अत्यंत तीव्र असतो त्यावेळी गाडी चालविण्याचा अट्टहास करणे. तसेच दारू किंवा गुंगी आणणाऱ्या पदार्थांनी नशा करून गाडी चालविणे.

थोडक्यात अशा सर्व गोष्टी ज्या चालकाच्या जागृत मनाच्या तर्कवितर्क करण्याच्या क्षमतेला चालना देऊन रंजकता किंवा विविधता टिकवण्यासाठी अंमलात आणल्या तर समृद्धी महामार्ग किंवा इतर सर्व दिर्घ पल्ल्याचे महामार्ग अपघातमुक्त,आनंददायी प्रवासासाठी आणि खऱ्या अर्थाने राष्ट्राच्या प्रगतीचे कारक घटक म्हणून ओळखले जातील. याबाबत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संमोहनतज्ञ डॉ. शैलेंद्र गायकवाड यांनी याबाबत कळविले आहे. वाहतुक सुरक्षा विभागाचे अतिरीक्त महासंचालक डॉ. रविंद्र कुमार सिंगल यांच्या मार्ददर्शनाखाली सुरक्षा विषयक उपाय केले जाणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com