‘फडणवीसांनी राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे सारथ्य करावे’

आपण राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे सारथ्य करावे म्हणजे माहाराष्ट्राचा नेता भाजप सरकार व उत्तरप्रदेशमधून सुरक्षित परत येईल.
Devendra Fadnavis-Raj Thackray
Devendra Fadnavis-Raj Thackray Sarkarnama

नाशिक : ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) अयोध्येत रामाच्या चरणी जात असतील, तर त्यांना जाऊ द्यावं. खासदार बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी त्यांना विरोध करण्याचे कोणतेही कारण नाही, असे तुम्ही स्वतः म्हणता. पण, आपले सरकार सिंह यांच्या रूपाने एका बाजूने ठाकरेंना विरोध करते. ही दुटप्पी भूमिका घेण्यापेक्षा राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे आपण स्वतः सारथ्य करावे,’’ असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नाशिकचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना केले.

फडणवीस यांनी गुरुवारी (ता. १२ मे) राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा आणि त्याला होणारा विरोध यावर भाष्य केले होते. त्याला आज (ता. १३ मे) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने युवकचे जिल्हाध्यक्ष कडलग यांनी पत्रक काढून प्रत्युत्तर दिले आहे. कडलग यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्या मुँह मे राम और बगल मे छुरी? देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रद्वेषी आहेत, हे मागील केंद्राचा निधी परत देणे तसेच इतर अनेक बाबींवरून सिद्ध झाले आहे. केवळ राज ठाकरेंच नाही, तर महाराष्ट्रातून कोणीही गेल्यास त्याचे समर्थन करावे.

Devendra Fadnavis-Raj Thackray
उद्धव ठाकरेंच्या सभेचं मला निमंत्रण; पण मी जाणार नाही : रामदास कदम

महाराष्ट्रातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्येला जाणार असल्याची चर्चा होत आहे. उत्तरप्रदेशमधील भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी मोर्चा काढून राज ठाकरेंच्या राम भेटीला विरोध केला आहे. त्याबाबत बोलताना फडणवीस म्हणाले होते की, राज ठाकरे अयोध्येत रामाच्या चरणी जात असतील तर त्यांना जावू द्यावं. खासदार सिंह यांनी विरोध करण्याचे काही कारण नाही, असे तुम्ही म्हणता. मग आपले सरकार सिंह यांच्या रूपाने एका बाजूने विरोध करते आणि दुसऱ्या बाजूने आपण जात असतील तर जावूद्या असे म्हणता. त्यापेक्षा आपण राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याचे सारथ्य करावे म्हणजे माहाराष्ट्राचा नेता भाजप सरकार व उत्तरप्रदेशमधून सुरक्षित परत येईल.

Devendra Fadnavis-Raj Thackray
आमदार राऊतांना बारबोले देणार धक्का : पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत करणार प्रवेश!

देवेंद्र फडणवीस आपण आपल्या केंद्र सरकारची बाजू महाराष्ट्रात आरडा ओरडा करून मांडत असता. मग बगल मे छुरी और मुँह मे राम हे असे कशाला? आता जनतेला उल्लू बनवण्याचे काम करू नका. महाराष्ट्राचा नेता उत्तर प्रदेशमधून सुरक्षित आणण्याचा विडा उचला. म्हणजे खऱ्या अर्थाने समर्थन होईल, असा टोमणाही कडलग यांनी फडणवीस यांना लगावला.

Devendra Fadnavis-Raj Thackray
महेश कोठे यांच्या मोबाईलवर ‘राष्ट्रवादी पुन्हा’ ची हॅलो टोन

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी सबुरीने घेताना ‘रामाच्या चरणी जो जात असेल त्याला जाऊ द्यावे, विरोध करण्याचे काहीच कारण नाही’ असा सल्ला देताना राज ठाकरे यांच्या अयोध्या दौराचे समर्थन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com