फडणवीसांचे मोठे वक्तव्य; धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहील

शिवसेना (Shivsena) नेमकी कोणाची हा वाद निवडणूक आयोगासमोर आहे
Devendra Fadnavis
Devendra FadnavisSarkarnama

धुळे : राज्यात गदा चालविल्याने सत्तापरिवर्तन घडले. आता गदा चालविण्याची गरज नाही. कारण आता हनुमान चालिसा म्हणण्यावर कुठलीही बंदी नाही. त्यामुळे आता गदा पूजेसाठी वापरावी. शिवाय, धनुष्यबाणही आपलाच आहे. मुखमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना धनुष्यबाणासह स्विकारले आहे, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेसह (Shivsena) महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली.

दोंडाईचा (ता. शिंदखेडा) येथील दादासाहेब रावल उद्योग समुहाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त शनिवारी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे कार्यकर्त्यांनी चांदीची गदा आणि धनुष्यबाण देत स्वागत केले. लोकनेते सरकारसाहेब रावल, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार जयकुमार रावल, आमदार अमरिश पटेल आदी उपस्थित होते.

Devendra Fadnavis
ठाकरेंची साथ सोडताना नेते ढसाढसा रडले पण कठोर निर्णयावर ठाम राहिले...

फडणवीस यांच्या हस्ते दादासाहेब रावल उद्योग समुहाच्या ग्लुकोज फार्मासुटीकल्स् प्रकल्पाचे लोकार्पण झाले. त्यावेळी सभेत उपमुख्यमंत्री म्हणाले, धनुष्यबाण नेमका कुणाचा? हा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. सद्यःस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकत्यांचे संख्याबळ पाहता धनुष्यबाण शिंदे यांच्याकडेच राहील, असे फडणवीस म्हणाले. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

Devendra Fadnavis
अखेर मुख्यमंत्र्यांना अमित शहांची वेळ मिळाली; औरंगाबादवरुन रात्रीच दिल्ली गाठणार...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील मराठी माणसाबाबत अपमानजनक वक्तव्य केल्याबाबत प्रतिक्रीया देताना फडणवीस म्हणाले, राज्यपालांनी केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही. राज्याच्या जडणघडणीसह विकासाच्या वाटचालीत मराठी माणसाचेही मोठे योगदान आहे. त्यामुळे जगभरात मराठीचे नाव पोहचले. राज्याच्या विकासात इतरांचाही सहभाग आहे. म्हणून मराठी माणसाचे महत्व कमी होत नाही. एखाद्या कार्यक्रमात अतिशयोक्तीच्या शब्दांच्या वापरातून भाषण करणे गरजेचे असते. राज्यपालांनी बहुदा त्या हेतूने वक्तव्य केले असावे. कुणालाही दुखावण्याचा त्यांचा हेतू नसावा, असे वाटते. राज्यपालांच्या मनात मराठी माणूस व राज्याबद्दल आकस नाही, असे ही फडणवीस म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com