Pankaja Munde : गोपीनाथ मुंडेंच्या पुतळ्याचे अनावरण; फडणवीसांना निमंत्रण नाही; पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितले!

Gopinath Munde News : दिवंगत भाजप (BJP) नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळा आज नाशिकमध्ये झाला.
Pankaja Munde, Devendra Fadnavis News
Pankaja Munde, Devendra Fadnavis NewsSarkarnama

Pankaja Munde News : दिवंगत भाजप (BJP) नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळा आज नाशिकमध्ये झाला. त्यानिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) या नाशिकमध्ये दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नाशिकमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नाही, असे पंकजा मुंडे यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नाही, ही चर्चा मी तुमच्याकडून ऐकली. मी या कार्यक्रमाची यजमान नाही. त्यामुळे यावर बोलणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

Pankaja Munde, Devendra Fadnavis News
Ramdas Kadam : उद्धव ठाकरेंची तुलना अफजल खानसोबत ; रामदास कदमांचा हल्लाबोल ; ठाकरे गट आक्रमक

शेतकऱ्याला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. यावर त्या म्हणाल्या, सरकारने शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, अशी माझीही अपेक्षा असल्याचे पंकडा मुंडे यावेळी म्हणाल्या.

Pankaja Munde, Devendra Fadnavis News
Bawankule : संजय राऊतांना मी एक आरसा पाठवतो, असं का म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

आज गोपीनाथ मुंडे असते तर परिस्थिती वेगळी असती का? असा प्रश्न यावेळी पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या, जर पक्षात काही नेते आज असते तर निश्चितपणे राजकीय चित्र वेगळे असते. मुंडे यांच्या या प्रतिक्रियेमुळे त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com