देवेंद्र फडणवीसांचा ‘पेन ड्राइव्ह’ गिरीश महाजनांना वाचवेल का?

देवेंद्र फडणवीसांच्या ‘पेन ड्राइव्ह’ प्रकरणाशी जळगावचा घनिष्ठ संबंध आहे.
Devendra Fadanvis & Girish Mahajan | Devendra Fadanvis News | Girish Mahajan News
Devendra Fadanvis & Girish Mahajan | Devendra Fadanvis News | Girish Mahajan NewsSarkarnama

जळगाव : देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) विधानसभेत केलेल्या ‘पेन ड्राइव्ह’च्या धमाक्यात गिरीश महाजनांशी (Girish Mahajan) संबंधीत आरोप केलाय. हे प्रकरण येथील मराठा विद्याप्रसारक संस्थेशी (Jalgaon) संबंधित आहे. या संस्थेतील भोईटे- पाटील गटाच्या वादात महाजनांचे नाव जोडले गेल्यापासून प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. (Girish Mahajan News)

Devendra Fadanvis & Girish Mahajan | Devendra Fadanvis News | Girish Mahajan News
महापौर सतीश कुलकर्णी रणांगणात उतरणार नाही!

मुळात जळगावातील मराठा विद्याप्रसारक संस्थेत भोईटे व नरेंद्र पाटील यांच्या गटात संस्थेच्या ताब्यावरून दोन दशकांपेक्षा जास्त काळापासून वाद आहे. २०१५ मध्ये संस्थेची सहकार कायद्यानुसार निवडणूक होऊन त्यात नरेंद्र पाटील गटाने सर्व जागांवर विजय मिळवत संस्थेवर वर्चस्व राखले. तेव्हापासून त्यांनी कारभारही सुरू केला.

२०१८ मध्ये कलाटणी

दरम्यान, २०१८ मध्ये तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात शिक्षण विभागाने आदेश काढत मविप्र संस्थेचा ताबा भोईटे गटाकडे असल्याचा दावा केला व पोलिस बंदोबस्तात भोईटे गटाने ताबाही घेतला. त्यातून भोईटे-पाटील गट भिडले व परस्परविरोधी गुन्हेही दाखल झाले.

...अन्‌ महाजनांचे नाव आले

हा सर्व प्रकार तेव्हा मंत्री असलेल्या गिरीश महाजनांच्या(Girish Mahajan) आदेशाने झाल्याचा आरोप नरेंद्र पाटील यांचे बंधू ॲड. विजय पाटील यांनी त्या वेळी केला होता. तेव्हापासून महाजनही पाटील गटाच्या रडारवर आले. त्या दिवसापासून ॲड. पाटील यांनी महाजनांच्या विरोधात कागदपत्रे जमविणे सुरू केल्याचे बोलले जातेय.

महाजनांविरुद्ध फिर्याद

यादरम्यान २०१९ मध्ये अनपेक्षितपणे मविआ सरकार सत्तेत आले. तेव्हापासून ॲड. विजय पाटलांनी पुन्हा ‘मविप्र’वर ताबा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. संस्थेच्या ताब्यारून भोईटे गटाने आपल्याला पुण्यात बोलवून डांबून ठेवले, महाजनांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकाकरवी धमकी देत खंडणी मागितली, अशी फिर्याद ॲड. पाटील यांनी निंभोरा (ता. रावेर) पोलिस ठाण्यात दिली. २०१८ मध्ये घडलेल्या या प्रकाराची अडीच वर्षांनी जळगाव जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने या प्रकरणावर महाजनांनी तेव्हापासूनच आक्षेप घेतला. हा गुन्हा कोथरूड पोलिस ठाण्यात वर्ग झाल्यानंतर महाजनांच्या अडचणी वाढल्या.

अटकेपासून सध्या दिलासा

ही फिर्याद बोगस असून, आपला संबंध नाही, असा दावा करत महाजनांनी त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात फिर्याद रद्द करण्यासाठी याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांना न्यायालयाने अटकेपासून दिलासा दिला.

‘पेन ड्राइव्ह’मध्ये हेच प्रकरण

फडणवीसांनी विधानसभेत ‘पेन ड्राइव्ह’संदर्भात केलेल्या गौप्यस्फोटात याच प्रकरणात महाजनांना अडकविण्याबाबतचे संभाषण असल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली असून, या प्रकरणाचा शेवट कशाने होतो, ते बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ॲड. चव्हाण अन्‌ जळगाव

ॲड. प्रवीण चव्हाण यांचा जळगावातील गाजलेल्या घरकुल प्रकरणाशी निकटचा संबंध आहे. जळगाव पालिकेच्या घरकुल घोटाळ्यात सरकारी वकील म्हणून ॲड. चव्हाण यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. त्यांचे व ॲड. विजय भास्कर पाटलांचे या प्रकरणाच्या निमित्ताने संबंध प्रस्थापित झालेत. त्यामुळे मविप्रचा वाद, विजय पाटलांची फिर्याद, महाजनांचा मविप्रतील हस्तक्षेप आणि प्रवीण चव्हाणांकडील केस... असे या प्रकरणाचे थेट कनेक्शन तर नाही ना, अशीही चर्चा सुरू आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com