देवेंद्र फडणवीस यांचे संकेत, एस. टी. कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण अशक्य

एस. टी. संपाबाबत मध्यम मार्ग काढण्याचा पर्याय सुचविला.
देवेंद्र फडणवीस यांचे संकेत, एस. टी. कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण अशक्य
Devendra FadanvisSarkarnama

नाशिक : सर्वांना कृषी कायद्याचे महत्त्व पटविण्यात कमी पडल्याने कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान मोदी यांनी घेताना मनाचा मोठेपणा दाखविला. लोकशाहीत अशा प्रकारचा मोठेपणा फार कमी लोक दाखवितात, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली. एस. टी. संपाबाबत मध्यम मार्ग काढण्याचा पर्याय सुचविल्याचे सांगताना कर्मचारी विलीनीकरण शक्य नसल्याचे संकेत यातून दिले.

Devendra Fadanvis
राष्ट्रवादीचा काँग्रेस-शिवसेनेला एकाच वेळी दे धक्का!

एका विवाह सोहळ्यानिमित्त श्री. फडणवीस नाशिकमध्ये आले होते. त्या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कृषी संदर्भातील तीन विधेयके मागे घेण्याचा निर्णय घेतल्याने पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका होत असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी हे मोदींचे मोठेपण असल्याचे सांगत कौतुक केले. टीका करणारे टीका करतात, काम करणारे काम करतात. देशाच्या पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला होता. परंतु काही लोक सातत्याने विरोध करत होते. हा निर्णय त्यांना पटवून देण्यात यश आले नाही, असे पंतप्रधानांनीच सांगितले. जे टीका करतात त्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केले नाही. त्यांची भूमिका दुटप्पी असल्याने लोक त्यांना उत्तरे देतील.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये कृषी कायद्यासंदर्भात अग्रलेख प्रसिद्ध झाला. त्यातून लिहिणाऱ्यांचा अहंकार झळकत असल्याचा टोला त्यांनी खासदार राऊत यांना लगावला. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत मध्यम मार्ग सुचविल्याचे सांगताना, एक प्रकारे विलीनीकरण शक्य नसल्याचे संकेत त्यांनी या वेळी दिले. मी सुचविलेल्या मध्यम मार्गाचा निर्णय राज्य सरकारला घ्यायचा आहे. एसटी कर्मचाऱ्यांबाबत राज्य सरकारची भूमिका जीवघेणी असल्याची टीकाही त्यांनी केली.

---

Related Stories

No stories found.