Devendra Fadanvis: ऋद्धपूर येथे मराठी भाषेचे विद्यापीठासाठी शासन सकारात्मक

उपमुख्यमंत्री फडणवीस यांची अखिल भारतीय महानुभाव संमेलनात घोषणा!
Devendra Fadanvis in Mahanubhav Rally
Devendra Fadanvis in Mahanubhav RallySarkarnama

नाशिक : ज्या भूमीत मराठीचा (Marathi) गजर झाला, लीळाचरित्र हा मराठीचा आद्यग्रंथ जिथे निर्मित झाला, त्या ऋद्धपूर येथे मराठी भाषेचे विद्यापीठ Marathi University) होणे योग्य आहे. या संदर्भात राज्य शासन (Maharashtra) सकारात्मक असून, लवकरच निर्णय घेऊ, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केले. (Maharashtra Government is positive on Marathi language University)

Devendra Fadanvis in Mahanubhav Rally
Eknath Khadse: भाजप-मनसेची युती झाली तर आश्चर्य नको

भगवान श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी जन्मोत्सव व अखिल भारतीय महानुभाव संमेलन डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. फडणवीस बोलत होते. ते म्हणाले, राज्याच्या इतिहासात प्रथम महाराष्ट्रीयन असावे हे सांगणारे श्री चक्रधर स्वामी होते. त्यांनी महाराष्ट्राला अस्मिता दाखवली. खऱ्या ज्ञानाची परिभाषा अहिंसा अहिंसेची शिकवण अंधश्रद्धा मिटविण्याचे काम त्यांनी केले.

Devendra Fadanvis in Mahanubhav Rally
Maratha Reservation: एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाचा आवाज दाबला?

भेदभाव, जातीप्रथा ज्या काळात टोकाला गेली होती, त्या काळात समतायुक्त समाजाचे अधिष्ठान श्री भगवान चक्रधर स्वामी यांनी केले. त्यांचा विचार हा मैलाचा दगड ठरला. महाराष्ट्र हे मंहतांचे राष्ट्र आहे. महंत म्हणजे थोर, हे त्यांनी जगाला पटवून दिले. लीळाचरित्र हा मराठीचा आद्यग्रंथ त्यांनी निर्माण केला. समाजाला दिशा देतो तो भगवान, दिशा देण्याचे काम त्यांच्या हातून घडले. ज्या भूमीतून मराठीचा गजर झाला त्या ऋद्धपूर येथे मराठी भाषेचे विद्यापीठ होणे योग्य आहे, या संदर्भात शासन अहवालाच्या आधारे चर्चा घडवून आणणे व मराठी भाषा विद्यापीठ होण्यासाठी सकारात्मक निर्णय घेईल.

ते पुढे म्हणाले, २९८ कोटी रुपयांचा ऋद्धपूर विकास आराखडा मागील सरकारच्या काळात रखडला होता, आता महानुभाव विचारांचे सरकार सत्तेत असल्याने लवकरच त्या विकास आराखड्याला मंजुरी देऊ महानुभावांच्या स्थळांवरील अतिक्रमण काढण्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेण्याचे आश्वासन श्री. फडणवीस यांनी या वेळी दिले.

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन म्हणाले, महानुभाव पंथ संमेलनानिमित्ताने पुन्हा एकदा मिनी कुंभमेळा बघण्याचा योग आला. सर्वांना सामावून घेणाऱ्या या महानुभाव पंथाने जगभरात विचारांचा प्रसार केला आहे. सर्वमान्य विचारांमुळे पंथाचे महत्त्व वाढतंय. अमरावतीचे कारंजेकरबाबा यांनी महानुभाव पंथाची माहिती दिली. माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी महानुभाव पंथाच्या कार्य व विस्ताराचा गौरव केला. आयोजक समितीचे दत्ता गायकवाड यांनी सर्वधर्म समभाव मानणारा महानुभाव पंथ असल्याचे सांगितले.

महापालिकेचे माजी सभागृह नेते व संमेलनाचे आयोजक दिनकर पाटील यांनी प्रास्ताविक केले. आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर, माजी आमदार बाळासाहेब सानप, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी आदी या वेळी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in