Maharashtra Onion Issue : मुख्यमंत्र्यांनी सांगूनही 'नाफेड'कडून कांदा खरेदी नाहीच

CM Eknath Shinde : माजी आमदार कोतवालांचे शेतकऱ्यांसह बेमुदत आंदोलन
Agitation in Chandwad (Nashik)
Agitation in Chandwad (Nashik)Sarkarnama

Former MLA ShirishKumar Kotwal : राज्याचे अर्थसंकल्पीय विधीमंडळ सुरू आहे. त्या विधीमंडळात विरोधकांनी कांद्याचे घसरलेले बाजाभाव हा मुद्दा लावून धरला. विरोधकांनी गळ्यात कांद्याच्या, कापसाच्या माळा घालून आंदोलनही केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाफेडमार्फत कांदा खरेदी सुरू केल्याची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी सांगूनही नाफेडकडून कांदा खरेदी होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

कांद्याचे घसरलेले दर स्थिर ठेवण्यासाठी सरकारने एक समितीही स्थापन केली आहे. तसेच नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू केल्याची माहिती विधीमंडळात मुख्यमंत्र्यांनी दिली. नाफेडला सांगूनही राज्यात कांदा खरेदी होत नसल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वी विधीमंडळातच विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही कांदा खेरेदी होत नसल्याचा दावा केला होता. आता नाशिक जिल्ह्यात कुठेही नाफेडकडून कांदा खेरेदी केला जात नसल्याची माहिती माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी दिली आहे.

Agitation in Chandwad (Nashik)
Kokan Politics : मोठी बातमी ! राष्ट्रवादीचा बडा नेता उद्या ठाकरे गटात प्रवेश करणार

राज्यात गेल्या एक ते दीड महिन्यांपासून कांद्याचे दर घसरलेले आहेत. विधीमंडळात विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला. त्यानंतर सरकारनकडून नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी केला जात असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान कृषि उत्पन्न बाजार समितीकडून कांद्याची खरेदी केली जात नाही. कांद्याला हमीभाव दिला जात नाही. सरकारकडून मिळणारे अनुदान बंद आहे. या पार्श्वभूमीवर चांदवड (नाशिक) येथे माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल (ShirishKumar Kotwal) यांनी शेतकऱ्यांसह बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Agitation in Chandwad (Nashik)
Vikhe Patil : नगर जिल्ह्याला अहिल्यादेवींचे नाव देणे भूषणावहच : विखे पाटलांनी भूमिका स्पष्ट केली

यावेळी कोतवाल यांनी शेतकऱ्यांची कौफियत मांडली. तसेच काही शेतकरी राष्ट्रपतींना स्वेच्छमरणाची मागणी करणारे पत्र पाठविणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली. कोतवाल म्हणाले, बाजारभावाअभावी एक ते दीड महिन्यापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा समस्या वाढल्या आहेत. त्यांना केलेला खर्च मिळत नाही. मुलांच्या शिक्षणाचा, लग्नाचा खर्च करता येत नाही. दैंनदिन खर्च करताना कसरत करावी लागते. त्यामुळे संसाराचा वर्षभराचा गाडा कसा चालवावा, हाच प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे.

शेतकऱ्यांना जगणे नको झाले असतानाही राज्य सरकार खोटे बोलत असल्याचा आरोप कोतवाल यांनी केला. ते म्हणाले, "आता बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघाला नाही. त्यामुळे पुढील वर्षी शेती करण्यासाठी त्यांच्याकडे भांडवल उरले नाही. शेतकऱ्यांना जगणे नको झाले आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी राष्ट्रपतींना स्वेच्छमरणाच्या मागणीचे पत्र पाठविण्याच्या तयारी केली आहे. अशी स्थिती असतानाही सरकार खोटे बोलत आहे. नाफेडने कांदा खरेदी सुरू झाल्याची खोटी माहिती देते. आजपर्यंत नाशिकमध्ये नाफेडकडून खरेदी केलेली नाही."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in