मंजुळा गावित यांच्या पाठपुराव्याने उपजिल्हा रुग्णालय मंजुर

आमदार मंजुळा गावित यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत बैठक घेतली.
Manjula Gavit
Manjula GavitSarkarnama

पिंपळनेर : साक्री (Dhule) येथील ४२ कोटींच्या निधीतील उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचा (Hospital Building) प्रस्ताव मंजूर करण्यात यश आले आहे. पाठपुराव्याअंती आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Dr. Tanaji Sawant) यांच्या उपस्थितीत मुंबईत (Mumbai) झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती आमदार मंजुळा गावित (MLA Manjula Gavit) यांनी दिली. (Manjula Gavit claims hospital building funds sanctions due to her follwup)

Manjula Gavit
अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत

आमदार गावित यांनी सांगितले, साक्रीत सध्या कार्यरत ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवून शंभर बेडचे उपजिल्हा रुग्णालय करण्याबाबत सतत पाठपुरावा सुरू होता. साक्री येथे अस्तित्वात तीस बेडच्या ग्रामीण रुग्णालयाची श्रेणीवर्धन करुन शंभर बेडच्या उपजिल्हा रुग्णालय करण्याचा प्रस्ताव शासनाने २००१ च्या लोकसंख्येवर आधारित राज्यात आरोग्य संस्था स्थापनेचा बृहत आराखडा १७ जानेवारी २०१३ ला मंजूर केला होता. मात्र, योग्य पाठपुरावा न झाल्याने हा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित होता.

Manjula Gavit
`सारथी`च्या माध्यमातून नोकऱ्या देणारे तयार व्हावेत!

सद्यःस्थितीतील जागेवर शंभर बेडचे उपजिल्हा रुग्णालय होणार नाही, असे अधिकाऱ्यांचे मत झाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशस्त इमारतीसाठी जागा शोधण्यापासून पाठपुरावा केला असता उपजिल्हा रुग्णालयासाठी भाडणे (ता. साक्री) येथील गट क्रमांक ४६४ मध्ये सरासरी दोन हेक्टरच्या जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. यानंतर भाडणे येथील जागा मंजूर करुन घेतली. उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचा बांधकामाचा आराखडा तयार करुन घेतला.

उपजिल्हा रुग्णालय इमारतीच्या बांधकामासाठी हायपॉवर कमिटीची आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या दालनात गुरुवारी बैठक झाली. बैठकीत साक्री उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकामाच्या कामास मंजुरी देण्यात आली. आरोग्य विभागाने इमारत बांधकामाचा प्रस्ताव तत्काळ मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव नवखळे यांच्याकडे अंतिम छाननीसाठी पाठवावा, असा निर्णय झाला.

साक्री उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला आहे. यासंदर्भात पुढील महिन्यात आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांच्या दालनात आरोग्य विभागाचे सचिव, बांधकाम विभागाचे सचिव, वित्त विभागाचे सचिव आदींच्या उपस्थितीत हायपॉवर समितीची बैठक होईल. मुंबईत गुरुवारी झालेल्या बैठकीस आरोग्यमंत्री डॉ. सावंत, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, सहसचिव, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या येथील कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी, उपअभियंता बिरारीस, कनिष्ठ अभियंता मनोज करनकाळ उपस्थित होते, अशी माहिती आमदार गावित यांनी दिली.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com