Ahmadnagar Politics: राम शिंदे-विखे पाटील वाद विकोपाला; फडणवीस थेट दोन दिवसीय नगर दौऱ्यावर

Ram Shinde vs Radhakrishna Vikhe Patil : शिंदे-विखे वादावर देवेंद्र फडणवीस तोडगा काढणार?
Ram Shinde vs Radhakrishna Vikhe Patil
Ram Shinde vs Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama

Ahmadnagar News: गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुरु आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे आमदार राम शिंदे यांच्यात वाद सुरु आहे. राम शिंदे यांनी नगर दक्षिणमधून खासदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून शिंदे-विखे यांच्यात दरी वाढत असल्याची चर्चा आहे.

त्यातच जामखेड बाजार समितीच्या निवडणुकीत राम शिंदे यांनी विखेंवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर नगर भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन दिवस (दि.25-26 मे) नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, राम शिंदे-विखे पाटलांमधील वादावर फडणवीस काय मार्ग काढणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ram Shinde vs Radhakrishna Vikhe Patil
Ram Shinde Vs Radhakrishna Vikhe Patil: राम शिंदे-विखे पाटलांमधील वादावर फडणवीस काय मार्ग काढणार ?

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्याच्या प्रभारीपदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. त्यामुळे या दौऱ्यात ते पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत. त्यामुळे राम शिंदे, विखे पाटील यांच्यातील वादावर फडणवीस काही बोलणार का? की शिंदे-विखे वादावर तोडगा काढणार? याकडे भाजपच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Ram Shinde vs Radhakrishna Vikhe Patil
Ahmadnagar Politics : नगर भाजपमध्ये राजकारण तापले; विखे-शिंदे वाद विकोपाला?

राम शिंदे-विखे पाटलांमधील वाद काय?

जामखेड बाजार समितीच्या सभापतीपदाच्या निवडीदरम्यान घडलेल्या घडामोडींवरून राम शिंदे आणि विखे पाटलांमध्ये वादाची ठिणगी पडली. जामखेड बाजार समितीच्या सभापती निवडीवेळी खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना छुपा पाठिंबा दिला, असा गंभीर आरोप राम शिंदेंनी केला होता.

त्यांच्या आरोपानंतर विखे पाटलांनीही त्यांना प्रतिउत्तर देत निशाणा साधला होता. त्यानंतर "या सर्व गोष्टी वरिष्ठांच्या कानावर घातल्या आहेत", असं शिंदे म्हणाले होते. तर "आम्ही देखील पक्षश्रेष्ठींशी बोलू", असं विखे म्हणाले होते.

दरम्यान, राम शिंदे यांनी केलेल्या आरोपामुळे नगरमधील भाजपच्या दोन बड्या नेत्यांमधील वाद समोर आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. पक्षातील अंतर्गत कलहाचा पक्षाला फटका बसू नये, यासाठी आता शिंदे-विखे वाद देवेंद्र फडणवीस कसा रोखणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com