नाथाभाऊ सारख्या शुध्द सोन्याची किंमत भाजपला कळली नाही!

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा अपमान केला. त्यांच्या खोट्या नाट्या चौकशा लावल्या.
Eknath Khadse, Ajit Pawar

Eknath Khadse, Ajit Pawar

sarkarnama

जळगाव : जळगाव जिल्हा शुध्द सोन्यासाठी प्रसिध्द आहे. मात्र, याच ठिकाणी असलेल्या एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या सारख्या नेत्याच्या नेतृत्वाची किमंत भाजपला (BJP) कळली नाही, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लगावला.

अजित पवार आज (ता.१७) जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. याप्रसंगी व्यासपीठावर एकनाथ खडसे, माजी आमदार संतोष चौधरी, माजी विधानसभा सभापती अरूणभाई गुजराथी, माजी आमदार डॉ, सतीश पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.

<div class="paragraphs"><p>Eknath Khadse,&nbsp;Ajit Pawar</p></div>
कर्जतमध्ये पुन्हा नाट्य : भाजपच्या अधिकृत उमेदवाराचा राष्ट्रवादीला पाठिंबा

या वेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, कि जळगाव शुध्द सोन्यासाठी प्रसिध्द आहे, याच ठिकाणच्या नाथाभाऊ खडसे या शुध्द सोन्यांची किंमत भाजपला कळली नाही, ती राष्ट्रवादी कॉंग्रेसला कळली आणि त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. ते अगोदर ज्या पक्षात होते, त्या पक्षाने खडसे यांना त्रास दिला, त्यांचा अपमान केला. त्यांच्या खोट्या नाट्या चौकशा लावल्या. या अगोदर या महाराष्ट्रात कधीच असे घडले नाही. मात्र, त्या पक्षाने ते घडविले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणला, त्या वेळी हे राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराचे राज्य असावे, सुसंस्कृत राज्य असावे असा त्यांचा विचार होता, आणि आजपर्यंत त्याच विचाराने राज्य सुरू होते.

<div class="paragraphs"><p>Eknath Khadse,&nbsp;Ajit Pawar</p></div>
एसटीत नवीन भरती सुरु केली तर... अजितदादांचा कर्मचाऱ्यांना निर्वाणीचा इशारा

आता ठराविक लोकांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. परंतु जो पक्ष हा त्रास देण्याचे काम करीत आहेत, त्यांना आपले सांगणे आहे, कि चार दिवस सासूचे असतात, चार दिवस सूनेचे असतात. त्यामुळे आज सार्वभौम जनता आहे, त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेने मताचा अधिकार दिला आहे. जर ही जनता खवळली तर ज्या प्रमाणे तुम्हाला डोक्यावर घेते त्या प्रमाणे मतांच्या अधिकारावर तुम्हाला बाजूला करू शकते हे लक्षात असू द्यावे असा, ईशाराही त्यांनी दिला. एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्हयात राष्ट्रवादी कॉंग्रेस वाढविण्याकडे आपण सर्वानुमते लक्ष देवू या असे मतही त्यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com