Nana Patole: नोटबंदी हा जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप केला
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सत्तेत येताच जनतेवर लादलेली नोटबंदी (Demonetization) म्हणजे जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार (corruption-) आहे. नोटबंदीनंतर देशभरातील भाजपच्या (BJP) नेत्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली, असा गंभीर आरोप काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला. (Congress state president Nana Patole criticise BJP & PM Narendra Modi)

Nana Patole
पालकमंत्रीपद : कुणाला मिळणार कोणता जिल्हा ?

नाशिक येथे श्री. पटोले यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा झाला, यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, भय आणि भ्रष्टाचार या दोन ‘भ’द्वारे देशाची लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. त्याद्वारे ओबीसी समाजाला मिळालेले संविधानिक अधिकारही हिसकावण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा घणाघात त्यांनी केला.

Nana Patole
Raj Thackeray : पैसेच मागणार असाल तर उद्योग येतील कसे, राज ठाकरेंचा सवाल !

या विभागीय कार्यकर्ता मंथन शिबिरात त्यांनी मार्गदर्शन केले. अखिल भारतीय काँग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष कॅप्टन अजयसिंग यादव यावेळी उपस्थित होते.

अन्यथा ईडीची भिती

सद्या काँग्रेससह प्रमुख विरोधी पक्षातील नेत्यांना फोडण्याचे काम सुरू आहे. भाजपमध्ये प्रवेश न केल्यास ईडी, सीबीआय मागे लावली जात आहे, संविधानिक मार्गाने सत्तेवर आलेल्या महाराष्ट, कर्नाटक, मध्यप्रदेश आदी राज्यातील काँग्रेस पक्षाची सरकार पाडून तेथे भाजपची सत्ता आणण्याचे काम देशपातळीवर सुरू असल्याचा गंभीर आरोप कॅप्टन यादव यांनी केला. काँग्रेस सत्तेवर आल्यावर भाजपमधील भ्रष्ट नेत्यांवर गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी तुरुंगात करू, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, शीतल चौधरी, सोनल पटेल, स्वागताध्यक्ष विजय राऊत, पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर, डॉ. हेमलता पाटील, राहुल दिवे, मिलिंद चित्ते, गौरव सोनार आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com