Shivsena News: `ईडी` चौकशीच्या नावाखाली देशात लोकशाहीचा खून!

खासदार संजय राऊत यांच्या अटकेच्या निषेधार्थ नंदुरबारला शिवसेनेतर्फे कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
Nandurbar Shivsena delegation at Nandurbar
Nandurbar Shivsena delegation at NandurbarSarkarnama

नंदुरबार : शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना केंद्रीय तपास यंत्रणेने (Centre agencies) जाणून-बुजून अटक केली आहे. देशात चौकशीच्या नावाखाली लोकशाहीचा खून करण्यात येत आहे, खासदार राऊत यांच्या अटकेचा नंदुरबार (Nandurbar) जिल्हा शिवसेनेतर्फे निषेध नोंदविण्यात आला. निषेधाचे निवेदन शिवसेनेचे नंदुरबार प्रमुख राजधर माळी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना दिले. (Centre agancies tourcharing opposition leaders in the name of inquiry)

Nandurbar Shivsena delegation at Nandurbar
Jalgaon News: मंदाताई खडसे म्हणाल्या, जिल्हा दूध संघाची चेअरमन मीच!

निवेदनात म्हटले आहे, की केंद्रीय तपास यंत्रणेने जाणून-बुजून हेतूपुरस्करपणे चौकशी करुन अटक केली. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत हे एकमेव नेते भाजपला पुरून उरत आहेत. आजच्या परिस्थितीत देशात भाजपच्या विरोधात जो कोणताही पक्ष बोलेल किंवा त्यांच्यातला नेता म्हणून त्याला कोणत्याही खोट्या प्रकरणात ईडीमार्फत चौकशी करुन जेलमध्ये टाकायचे किंवा घाबरुन भाजपमध्ये प्रवेश करुन घ्यायचे असे प्रकार देशात घडत असल्याचे दिसत आहे.

Nandurbar Shivsena delegation at Nandurbar
Dhule News: समस्या कळल्या ना; आता ‘रिझल्ट’ दाखवा!

देशात लोकशाहीचा पूर्णपणे खून करण्यात येत असून, खा.संजय राऊत यांना याआधी अनेक धमक्या दिल्या गेल्या. त्यांना चौकशीच्या नावाखाली ईडीमार्फत अटक करण्यात आली. याचा निषेध नंदुरबारमध्ये करण्यात आला. शिवसेना नंदुरबार जिल्हाप्रमुख तथा आमदार आमश्या पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शिवसेना महानगर व शहरतर्फे निषेध करण्यात आला.

या प्रसंगी, नंदुरबार शहर प्रमुख राजधर माळी, महानगर प्रमुख पंडित माळी, भक्तवत्सल सोनार, युवासेना जिल्हा अधिकारी अर्जुन मराठे, उपजिल्हा अधिकारी सागर पाटील, युवासेना नंदुरबार शहर प्रमुख दादू कोळी, दिनेश भोपे, सुरेखा वाघ, आनंद पाटील, श्री. भाबड आदी उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in