Rural Politics; चांदोरीत नवनिर्वाचीत सरपंचाने केला पराभूताचा घरी जाऊन सत्कार

निफाड तालुक्यातील प्रतिष्ठेच्या चांदोरी गावातील उमेदवारांत घडले राजकीय सुसंस्कृतपणाचे दर्शन.
Newly Elected Sarpanch Vinayak Kharat, Sanjay Gaykhe
Newly Elected Sarpanch Vinayak Kharat, Sanjay GaykheSarkarnama

सागर आहेर

चांदोरी : (Niphad) ग्रामपंचायत निवडणुका अत्यंत चुरशीने लढल्या जातात. बहुतांश उमेदवार देखील एकाच कुळातले किंवा वाडयातील असल्याने निकालानंतर डोळे मळके होतात. अनेक गावांत वाद-विवाद व शारीरीक हल्ले देखील झाले. मात्र सर्वात मोठे गावठाण असलेल्या चांदोरी (ता. निफाड) गावात मात्र सरपंचपदाच्या उमेदवारांत वेगळ्याच सुसंस्कृतपणाचे दर्शन घडले. त्यामुळे ते चर्चेचा विषय ठरले. (Political leaders & Candidates shown a healthy political culture in Chandori village)

Newly Elected Sarpanch Vinayak Kharat, Sanjay Gaykhe
Womens Politics; शेतात राबता, राबता कुसुम चव्हाणके झाल्या गावच्या कारभारी!

ग्रामपंचायत निवडणुकीत अन्य ठिकाणी जय, पराजयानंतर निवडणुकीला वादाचे गालबोट लागले. वाद-विवाद रंगले. पराभूत व विजयी उमेदवारांतील दरी वाढली. मात्र राजकीय दृष्टीने संवेदनशील असलेल्या चांदोरीमध्ये राजकिय खिलाडुवृत्ती पहायला मिळाली. त्यामुळे गावात परिसरात चर्चेचा विषय ठरला.

Newly Elected Sarpanch Vinayak Kharat, Sanjay Gaykhe
Shocking News; संपर्कप्रमुखांनीच फोडले शिवसेनेचे 13 नगरसेवक?

तालुक्यातील ग्रामपंचायत लढतींपैकी एक लढत होती ती चांदोरीतील शिवसेनेच्या (ठाकरे गट) श्री गणेश ग्रामविकास पॅनलचे विनायक खरात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत ग्रामविकास पॅनलच्या संजय गायखे यांच्यात. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या विनायख खरात यांनी संजय गायखे यांचा पराभव केला. निकाल जाहीर झाल्यावर चांदोरी- नागापूर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे ११ उमेदवार विजयी झाल्याने त्यांची सत्ता आली.

गट, कुळ, टीका टिपण्णीसह विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक गाजली होती. नवनिर्वाचित सरपंच विनायक खरात यांनी निवडणुकीतील सर्व मतभेद बाजूला ठेवत एकोप्याचे दर्शन घडवले. विनायक खरात विजयी झाल्यावर पराभूत उमेदवार संजय गायखे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. एव्हढेच नव्हे तर ज्येष्ठ या नात्याने त्यांना पदस्पर्श करून, सत्कार करीत त्यांचे आशिर्वाद घेतले.

श्री. गायखे यांच्या कुटुंबीयांनी देखील सुसंस्कृतपणा दाखवत विनायक खरात यांचं स्वागत तसेच मान पान केला. गायखे परिवाराने शाल श्रीफळ देत त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी विनायक खरात म्हणाले, आशिर्वाद असु द्या, मी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. विकासासाठी सर्वांनी एकत्र रहावं, ही माझी अपेक्षा आहे. भेट, चर्रा झाल्यावर श्री. गायखे विनायक खरात याना दारापर्यंत पोहोचविण्यासाठी आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com