Ahmednagar : नगर जिल्हा बँकेतील पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी; फुटीर संचालकावर कारवाई होणार?

Ahmednagar District Central Cooperative Bank : पुरेसे संख्याबळ असताना देखील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव झाला.
Ahmednagar District Central Cooperative Bank
Ahmednagar District Central Cooperative BankSarkarnama

Ahmednagar NCP : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक नुकतीच (दि.८ मार्च) पार पडली. या निवडणुकीमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची निवड झाली. तर राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा पराभव झाला.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भाजपचे सहा संचालक आहेत. तर महाविकास आघाडीचे १४ संचालक आहेत. मात्र, पुरेसे संख्याबळ असताना देखील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अवघ्या एका मताने पराभव झाला. हा पराभव राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

Ahmednagar District Central Cooperative Bank
Ahmednagar Politics : नगरच्या राजकारणात 'पिसाळ पॅटर्न'ची चर्चा; काय आहे हा पॅटर्न?

या पराभवानंतर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अॅक्शन मोडवर आले आहेत. राष्ट्रवादीचे कोणती मते फुटली? राष्ट्रवादीच्या संचालकांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेत संख्याबळ असतानाही पराभव कसा झाला? या सर्व बाबींची चौकशी करण्यात येणार असून अहवाल पक्षाच्या वरिष्ठांना पाठवण्यात येणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले आहे.

Ahmednagar District Central Cooperative Bank
Ahmednagar : नगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड होताच कर्डिलेंनी सांगितलं विजयाचं गणित

दरम्यान, या निवडणुकीच्या (दि.८ मार्च) आधी एक दिवस राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी बँकेच्या संचालकांची बैठक घेत बँकेच्या अध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत चर्चा देखील केली होती. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठक घेऊन देखील निवडणुकीमध्ये काही संचालक फुटले.

त्यामुळे फुटलेल्या संचालकांची पक्षाकडून आता चौकशी करण्यात येणार असून याबाबतचा अहवाल पक्षातील वरिष्ठ नेत्यांना पाठविण्यात येणार असल्याचे समजते आहे. त्यामुळे फुटीर संचालकाविरूद्द पक्ष काय कारवाई करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com