देशात कुठेही झाले नाही ते नाशिककरांनी करून दाखविले!

नाशिककर आणि लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळेच हेल्मेटसक्ती यशस्वी.
Police commissioner Deepak Pande
Police commissioner Deepak PandeSarkarnama

मालेगाव : जनहिताच्या नजरेतून चांगल्या भावनेने ‘नो हेल्मेट-नो पेट्रोल’ ही संकल्पना राबविली. नाशिककरांवर असलेला विश्‍वास पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यासह नाशिकचे (Nashik) आमदार व लोकप्रतिनिधींनी दिलेले पाठबळ यामुळे देशात फक्त नाशिकमध्ये हेल्मेट वापराचे प्रमाण ८५ टक्क्यांवर पोचले आहे, ही समाधानाची बाब आहे. देशात कुठेही जे यशस्वी झाले नाही ते नाशिककरांनी करून दाखविले. त्यांच्या सहकार्यामुळेच हेल्मेटसक्ती यशस्वी झालो, असे प्रतिपादन नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे (Deepak pande) यांनी सांगितले.

Police commissioner Deepak Pande
एसटीबाबत आपुलकी संपली?; एक होती एसटी... असं होऊ नये!

सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘सकाळ गौरव भूमिपुत्रांचा’ पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. हिंदी-मराठी चित्रपट सिनेअभिनेता विजय पाटकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील (नाशिक ग्रामीण) आदी प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

Police commissioner Deepak Pande
एकनाथ खडसेंवर 'ठाण्या'त उपचार करा ; गिरीश महाजनांचा टोमणा

श्री. पांडे म्हणाले, की राज्य शासनाने २०१६ मध्ये हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला. एका आठवड्यात तो बंद झाला. कोलकत्ता येथील या निर्णयाची दोन महिने अंमलबजावणी झाली. बंगलोर, लखनौ येथेही हे यशस्वी होऊ शकले नाही. याबद्दल नाशिककरांना धन्यवाद देतानाच त्यांनी स्वत:चा ओळख परिचय करून देत पोलिस प्रशासनातील अनुभव कथन केले.

कोरोनाकाळात आपल्यासाठी संधी आहे. आपण सगळे चीनवर अवलंबून आहोत. चिनी वस्तू विक्रीतून व्यावसायिकांना मोठा नफा होत होता. कोरोनाकाळात स्वदेशी वस्तू खरेदीची शिकवण मिळाली. गावातील पैसा गावात व देशात राहील. यामुळे संकटाला न डगमगता त्यावर मात करावी. सेवाभावी डॉक्टर बोटावर मोजण्याइतके असले तरी चांगल्याच्या पाठीशी समाज उभा राहतो. समविचारी मित्रांचे सहकार्य, बैरागढ येथील आदिवासी बांधवांचा विश्‍वास, पत्नी व कुटुंबीयांचे सहकार्य यामुळे दुर्गम व दुर्लक्षित भागात काम करणे शक्य झाले. आरोग्याबाबत प्रत्येकजण जागृत झाला. शेती, सिंचन, प्रबोधन, शिक्षण या बरोबरच जनसामान्यांच्या समस्या सोडविण्याचे काम केले. त्यात अडचणी आल्या. तसा मार्गही निघाला.

गुणिजनांचा सन्मान

कसमादेसह चांदवड, नांदगाव परिसरात सामाजिक, राजकीय, सहकार, सांस्कृतिक, वैद्यकीय, प्रशासकीय, उद्योजक, कृषी, बँकिंग, बांधकाम व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ५४ गुणिजनांचा दोन टप्प्यात ‘सकाळ गौरव भूमिपत्रांचा’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे, हिंदी-मराठी चित्रपट सिनेअभिनेता विजय पाटकर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र कोल्हे, जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील आदींच्या हस्ते सन्मान्नित करण्यात आले. ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सोहळ्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र व कळवण तालुका छत्रपती स्मारक समिती प्रायोजक होते. श्री. पांडे, श्री. पाटकर, डॉ. कोल्हे व श्री. पाटील यांचा संपादक डॉ. रनाळकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कोरोना निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर दोन टप्प्यात विजेत्यांना सन्मान्नित करण्यात आले. ऐश्‍वर्या लॉन्समध्ये शुक्रवारी सायंकाळी झालेल्या सोहळ्याला मोजके निमंत्रित होते. ‘साम’चे वृत्तनिवेदक भूषण करंदीकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. पुरस्कार सोहळ्याचे हे तृतीय वर्षे होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com