
नाशिक : मशिदीसमोर (Mosque) भोंगे लाऊन हनुमान चालीसाचे (Hanuman chalisa) पठण करण्याचा राजकीय इशारा देणाऱ्या मनसेच्या (MNS) किती नेत्यांना हनुमान चालीसा व त्यातील संदेश माहिती आहे, हे सांगता येणार नाही. मात्र याबाबत नियमांचे कठोर पालन करण्याची तंबी देणारे पोलिस (Police) आयुक्त दीपक पांडे (Deepak Pande) यांना हनुमान चालीसा मुखोदगत आहे. ती देखील बालवयापासून. त्यामुळे तो त्यांचा संस्कार आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हा राजकारणाचा विषय केला. मशिदीवरील भोंगे उतरवा अन्यथा दिवसातून पाच वेळा मशीदीपुढे भोंगे लावून हनुमान चालीसा सादर करू असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानुसार आंदोलनाची तयारी करणाऱ्या मनसेच्या नेत्यांना नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी चांगलेच फैलावर घेतले.
याबाबत नियम व कायद्याचे काटेकोर पालन करण्याचा इशारा देत त्यांनी मशिदीपुढे हनुमान चालीसा म्हणता येणार नाही. मशिदीपासून १०० मीटर अंतरावर हनुमान चालीसा म्हणा मात्र पोलिसांची परवानगी घेऊन. विना परवाना मशिदीपुढे भोंगे लावून हनुमान चालीसा म्हटली तर चार महिने कैद व प्रसंगी तडीपारीची कारवाई होईल असे पोलिसांनी स्पष्ट केले. राज्यात पहिल्यांदाच असा आदेश काढण्यात आला. त्यामुळे राज ठाकरे यांचे अनुयायी पांडे यांच्यावर टिका करीत आहेत.
पोलिस आयुक्त पांडे यांच्यावर मनसेचे कार्यकर्ते टिका करीत असले तरीही किती मनसेच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वी हनुमान चालीसा म्हटली आहे. त्याचा संदेश समजुन घेतला आहे. त्यातील संदेशाचे व्यक्तीगत जीवनात इनुकरण केले आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांना हनुमान चालीसा पाठ आहे का? याचे उत्तर माहित नाही असे आहे. मात्र दीपक पांडे यांचे तसे नाही, त्यांना हनुमान चालिसा मुखोदगत आहे. ते देखील बालवयापासून. त्यामुळे पांडे यांना हनुमान चालिसा विषयी बोलण्याचा अधिकार नक्कीच इतरांना पोहोचत नाही.
पोलिस आयुक्त दीपक पांडे जसे गोदाप्रेमी, गोदाभक्त आहेत, तसे ते बालवयापासून हनुमान भक्त देखील आहेत. मात्र जेव्हा पोलिस अधिकारी म्हणून कायद्याच्या अंमलबजावणीसाठी अधिकार वापरण्याची वेळ येते तेव्हा ते कर्तव्य कठोर बनतात. हे त्यांच्या कार्यशैलीवरून दिसून येते. त्यामुळे त्यांची ही कार्यशैली सतत काही तरी नवे करण्याचा प्रयत्न करत असते. मशिदीवरील भोंगे या राजकारणावर देखील त्यांनी नवी वाट चोखाळली आहे.
...
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.