बलात्काराच्या आरोपीला पकडा, ही मागणी करणे गुन्हा आहे काय?

पॅरोलवर सुटलेल्या आरोपीने अंबड भागात एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली.
seema hire
seema hireSarkarnama

नाशिक : आम्ही म्हणत होतो, बलात्कार (Rape In Nashik) करणाऱ्या गुन्हेगाराला पकडा. यात गैर काय आहे. मात्र पोलिसांनी (Police register a crime on BJP MLA) तुमच्यावर गुन्हे दाखल करू असे धमकावल्याने आम्हाला अंबड पोलिस ठाण्यात आंदोलन (Agitation at Ambad Police Station) करावे लागले, असे भारतीय जनता पक्षाच्या (BJP Agitation) आमदार सीमा हिरे (MLA Seema Hire) यांनी सांगितले.

seema hire
बलात्कार करून पळणाऱ्या गुन्हेगारास तासाभरातच अटक!

पॅरोलवर सुटलेल्या खुनातील आरोपी नितीन पवार यांनी दोन दिवसांपूर्वी अंबड येथील एका ब्युटी पार्लरमध्ये महिलेला चाकूचा धाक दाखवला. त्यानंतर त्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर खळबळ उडाली. त्यावर भाजपसह विविध राजकीय पक्षांनी प्रतिक्रीया दिल्या. मात्र भाजपच्या आमदार सीमा हिरे व त्यांच्या सहाकारी नगरसेवकांनी थेट पोलिस ठाण्यात जाऊन आक्रमक भूमिका घेतली. त्यानंतर आंदोलन केल्याने तपासात अडथळा आल्याचा दावा पोलिसांनी केला. आमदार हिरे यांसह १८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यासंदर्भात आमदार हिरे यांनी आपली भूमिका मांडली.

seema hire
बलात्काराचे राजकारण आमदार सीमा हिरेंना पडले महागात!

त्या म्हणाल्या, आम्हाला ही घटना समजल्यावर संताप झाला. राज्यात विविध शहरांत महिलांवर अत्याचार वाढत आहेत. रोज त्या बातम्या कानावर येतात. पोलिसांचा वचकच राहिलेला नाही. गुन्हेगार खुले आम अत्याचार करू लागलेत, हे समाजाला धक्कादायक आहे. त्याचा राग स्वाभाविक आहे. त्यामुळेच आम्ही कार्यकर्ते, नगरसेवक पोलिस ठाण्यात गेलो होतो. आम्ही फक्त निवेदन देऊन आरोपीला तातडीने पकडावे एव्हढीच मागणी करीत होतो. पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा करीत असताना सहाय्यक पोलिस आयुक्त शेख यांनी आमची मागणी समजून घेतली नाही. उलट आमच्यावरच गुन्हे दाखल करू असे धमकावले. त्यानंतर कार्यकर्त्यांचा संयम सुटला व त्यांनी आंदोलन केले. यामध्ये गैर काहीच केलेले नाही. मात्र पोलिसांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

आमदार हिरे म्हणाल्या, आमच्यावर गुन्हे दाखल केल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्था बदलेल का?. आज राज्यात रोजच महिला अत्याचाराच्या घटना घडतात. गुन्हे वाढत आहे. त्यावर नियंत्रण आवश्यक आहे. नाशिकचे पोलिस मात्र वेगळ्याच दिशेने काम करीत आहेत, हे योग्य नाही. आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्या प्रमाणे नाशिकमध्ये खरोखरच मोगलाई अवतरली आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com