Malegaon: मांजरपाडा दोनसाठी भुसेंनी पुढाकार घ्यावा!

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते डॉ. जयंत पवार यांनी केली मागणी.
Dada Bhuse & Dr. Jayant Patil
Dada Bhuse & Dr. Jayant PatilSarkarnama

मालेगाव : मांजरपाडा-२ (Manjarpada Irrigation Project) या प्रकल्पाकडे शासनाने (Government) पुन्हा दुर्लक्ष केले आहे. या भागाचे प्रतिनिधित्व करणारे बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांनी यासंदर्भात पुढाकार घ्यावा. मालेगावसह (Malegaon) कसमादेतील जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते डॉ. जयंत पवार (Dr. Jayant Patil) यांनी केली आहे. (NCP leader Dr. Jayant Patil deemands for Majnarpada-2 project)

Dada Bhuse & Dr. Jayant Patil
Eknath Shinde: `होय आम्ही कंत्राट घेतले आहे`

नाशिक जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रासाठी राज्य शासनाने जवळपास पंधराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. उर्ध्व गोदावरी प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. असे असताना गिरणा खोऱ्याला लाभदायी ठरणारा व कसमादेवासीयांना त्याची प्रतिक्षा आहे.

Dada Bhuse & Dr. Jayant Patil
Shivsena: गुलाबराव पाटलांचे वक्तृत्व उद्धव ठाकरेंना सहन झाले नाही!

गिरणा खोरे मुळात तुटीचे खोरे आहे. कसमादेसह खानदेशमधील नागरिकांसाठी मांजरपाडा प्रकल्प वरदान ठरणारा आहे. गेल्या चार दशकांपासून यासंदर्भात मागणी होत आहे. मांजरपाडा-१ ला शासनाने परवानगी देऊन प्रत्यक्ष कामही पूर्णत्वाकडे आहे. त्याचवेळेस मांजरपाडा-२ प्रकल्प कार्यान्वित करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, गेल्या पाच ते सात वर्षांपासून या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. राज्यातील एकनाथ शिंदे व भाजप सरकारने उर्ध्व गोदावरी प्रकल्पासाठी दीड हजार कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. ही समाधानाची बाब असली, तरी मांजरपाडा-२ कडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

मंत्री दादा भुसे यांनी हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून तो मंजूर करून घ्यावा. मांजरपाडा-२ प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी दादा भुसे यांनी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे. मांजरपाडा-२ कार्यान्वित झाल्यास कसमादेसह खानदेशमधील शेतीला त्याचा फायदा होईल. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील शेकडो पाणीपुरवठा योजनांनाही फायदा होऊ शकेल. मंत्रिमंडळात मालेगाव व कसमादे भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दादा भुसे यांनी या प्रश्‍नाला सर्वाधिक प्राधान्य देत तो सोडवावा, अशी मागणीही डॉ. पवार यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in