कृषिमंत्री दादा भुसे यांनी ४० वर्षात कमवले ते बंडाने मातीत घातले!

मोजके समर्थक वगळता नागरिक, शिवसेनेत दादा भुसे यांच्या विषयी मोठी नाराजी पसरली आहे.
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama

मालेगाव : राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) गुरुवारी रात्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गोटात सहभागी झाले. ते गुवाहाटी येथील रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये दाखल झाले. तीन दिवस मुंबईत तळ ठोकून असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) व पक्षाची पाठराखण करणारे श्री. भुसे अंतिम क्षणी गुवाहाटीला गेल्याने पक्षाला धक्का बसला. (Dada Bhuse`s move criticised by Shivsena leaders)

Dada Bhuse
शिवसेनेने बंडखोरांना दिलेल्या ऑफरमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पोटात गोळा

यानंतर शुक्रवारी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत श्री. ठाकरे तसेच ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनीही त्यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली. यामुळे श्री. भुसे राज्य पातळीवर टीकेचे धनी झाले आहेत.

Dada Bhuse
एकनाथ शिंदेना समर्थन दिल्याने जिल्हाप्रमुखांना फरार व्हावे लागले?

मालेगाव व परिसरातील कार्यकर्त्यांनी श्री. भुसे यांना पाठिंब्यासाठी सोशल मीडियावर ‘सदैव आपल्या सोबत, जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी, जिथे तुम्ही तेथे आम्ही, एकच वादा ओनली दादा’ यांसह विविध ओळी, म्हणी, गाणी व काव्य पक्तींचे स्टेटस ठेवले आहेत. स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी श्री. भुसे यांना एकमुखी पाठिंबा दिला आहे.

याउलट खासदार संजय राऊत यांनी मात्र श्री. भुसे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. ट्विटरद्वारे त्यांनी खरीप हंगामात कृषिमंत्री प्रत्येक आठवड्यात राज्यातील पेरणीचा आढावा घेत असतात. सध्या राज्यात पाऊस कमी आहे. पेरण्या लांबत आहेत. राज्याचे कृषिमंत्री भुसे आसाम येथे चिंतन शिबिरात जाऊन बसल्याने शेतकरी वाऱ्यावर आहे. मुख्यमंत्री कृपया आपण लक्ष द्या,. अशा आशयाची टीका केली आहे.

श्री. राऊत यांनी भुसेंवर टिकेचे बाण सोडल्यानंतर शुक्रवारी दुपारी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालपर्यंत सोबत असलेले व मेलो तरी सेना सोडणार नाही, असे म्हणणारेही पळून गेल्याची टीका श्री. भुसे यांचे नाव न घेता केली आहे. भुसे यांच्यासमवेत असलेल्या संजय राठोड यांना मात्र त्यांनी वाईट आरोप होऊनही मी त्यांना सांभाळलं, असे सांगतानाच खंत व्यक्त केली.

दरम्यान श्री. भुसे काल रात्री आमदार रवींद्र फाटक, आमदार संजय राठोड, सचिन नाईक यांच्यासह गुवाहाटीत पोहोचले. श्री. शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. हॉटेलवर फोटोसेशन सुरू असताना श्री. भुसे पऱ्यात उभे राहत असताना अन्य आमदारांनी त्यांना ‘दादा इकडे या’, असे म्हणत थेट श्री. शिंदे यांच्या शेजारी उभे केले. त्यावरूनच दोघांमधील जवळीक, मैत्रीची प्रचीती आली. जिल्ह्यातील शिवसेनेचे दोघे आमदार श्री. शिंदे यांच्या गोटात गेल्याने कसमादे व चांदवड, नांदगाव परिसरात शिवसेनेला काही प्रमाणात फटका बसणार आहे. त्याचवेळी हा तिढा केव्हा सुटणार... अंतिमत: नेमके काय होणार, याचीही उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com