Dada Bhuse: नव्या मंत्रीमंडळात दादा भुसे यांची पदावनती, समर्थक नाराज!

मंत्र्याच्या खाते वाटपामध्ये उत्तर महाराष्टारात भाजपची बल्ले बल्ले, दादा भुसेंची पदावनती!
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama

नाशिक : राज्य (Maharashtra) मंत्रीमंडळाचे खातेवाटप आज जाहीर करण्यात आले. त्यात शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात सहभागी झालेल्या दादा भुसे (Dada BHuse) यांना खाते मिळाले मात्र दुय्यम. त्यामुळे त्यांचे सगळेत समर्थक नाराज झाले आहेत. उत्तर महाराष्ट्रात भाजपची (BJP) बल्ले बल्ले तर शिंदे गटाच्या दादा भुसे यांची पदावनती अशी स्थिती आहे.(Dada Bhuse got a inferior portfolio in Shinde Government)

Dada Bhuse
Nashik News: शेतीचे पंचनामे तातडीने करा, भरीव मदत द्या!

राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

Dada Bhuse
Chhagan Bhujbal: विनायक मेटे यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. इतर १८ मंत्र्यांची खाती देखील वाटप करण्यात आली.

दादा भुसे यांच्याकडे गेल्या मंत्रीमंडळात कृषी खाते होते.स्वतः भुसे कोरडवाहू व दुष्काळी भागातील आहेत. त्यांच्याकडे कृषी विभाग असतांना त्यांचा बुहतांशी वेळ हे खाते समजून घेण्यातच गेला होता. या खात्यावर त्यांची पकड व अभ्यास नाही, त्यामुळे कृषी विभागाला अभ्यासू मंत्री मिळावा अशा बातम्या विविध माध्यमांत झळकल्या होत्या. अशी पार्श्वभूमी असताना भुसे यांना मिळालेले खाते व त्याचा कारभार समजताच त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज झाले.

उत्तर महाराष्ट्रात नंदुरबारचे विजयकुमार गावित वादग्रस्त व विविध आरोप असूनही त्यांना आदिवासी विकास, गिरीश महाजन व गुलाबराव पाटील यांच्याकडेजुनीच खाती राहीली आहेत. त्यामुळ दादा भुसे यांची पदावनती झाली, अशी चर्चा होती.

जाहीर करण्यात आलेली खाती अशी, राधाकृष्ण विखे-पाटील -महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, सुधीर मुनगंटीवार-वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय, चंद्रकांत पाटील-उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य, डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास, गिरीष महाजन-ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण, गुलाबराव पाटील-पाणीपुरवठा व स्वच्छता, दादा भुसे- बंदरे व खनिकर्म.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com