गुन्हे सिद्ध होण्याच्या प्रमाणात वाढ होईल!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन.
Ajit Pawar, Dy. C. M.
Ajit Pawar, Dy. C. M.Sarkarnama

नाशिक : महाराष्ट्र पोलिस दलाच्या (Maharashtra Police) गुन्हे अन्वेषण क्षमतेत गुणात्मक (Qualitative) वाढ करण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण (Crime investigation school) विद्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गुन्हे सिद्धीच्या प्रमाणात वाढ होणार आहे. त्यातून कायदा व सुव्यवस्था बळकट होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

Ajit Pawar, Dy. C. M.
`एसटी`ची गाडी आली रुळावर...प्रवासी मात्र बांधावर!

येथील गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते.

Ajit Pawar, Dy. C. M.
राज ठाकरेंना इशारा... तर वारकरी गुन्हे दाखल करतील!

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या नवीन इमारतीच्या माध्यमातून प्रशिक्षणाच्या दर्जात, गुणवत्तेत, क्षमतेत वाढ होईल, पोलिसांच्या गुन्हे अन्वेषणासंदर्भातल्या ज्ञान, अनुभव, कौशल्यात भर पडेल, राज्यातील गुन्हे नियंत्रण आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यास याचा फायदा होईल.

साडेसात कोटी रुपये खर्चून प्रशासकीय इमारत, ११ कोटी रुपये खर्चून वसतीगृह इमारत आणि अडीच कोटी रुपये खर्चाचं भोजनालय, सुमारे २१ कोटी रुपये खर्चून हे गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाचं नवीन संकूल उभं राहिलं आहे. एका वेळी २०० पोलिसांना प्रशिक्षण देऊ शकणाऱ्या या वास्तूचं लोकार्पण ही महाराष्ट्र पोलिसांसाठी गौरवाची बाब आहे. प्रशिक्षण विद्यालयाच्या या नवीन इमारतीच्या उभारणीत सहकार्य, योगदान दिलेल्या सर्व मान्यवर लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि संबंधित सर्वांचं यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले.

कौतुकास्पद कामगिरी

या संस्थेची संथापना १९८१ मध्ये झाली. या संस्थेच्या माध्यमातून पोलिस अंमलदारांना गुन्ह्यांच्या तपासाचं शास्त्रोक्त, अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येतं. एफआयआर नोंदवण्यापासून चार्जशीट दाखल करण्यापर्यंतची प्रक्रिया याठिकाणी शिकवली जाते. आतापर्यंत ३८५ प्रशिक्षण सत्रांच्या माध्यमातून २५ हजार पोलिस अंमलदारांना गुन्हे तपासाचं पायाभूत प्रशिक्षण देण्यात आले. २९३ प्रशिक्षण सत्रांच्या माध्यमातून २५ हजार पोलिस अंमलदारांना, १२ प्रकारच्या गुन्हे तपासासाठी विशेष प्रशिक्षित करण्यात आले. कोविड काळात ९३ सत्रांच्या माध्यमातून साडे सहा हजार अंमलदारांना इथून ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आमदार हिरामण खोसकर, अपर पोलीस महासंचालक संजय कुमार, महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालिका अर्चना त्यागी, महाराष्ट्र पोलीस अकादमीचे संचालक राजेश कुमार, पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर, पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस अधिक्षक सचिन पाटील, गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाचे प्राचार्य अशोक नखाते आणि आदी उपस्थित होते.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com