"महाराष्ट्रात झालेला चमत्कार २०२४ मध्ये दिल्लीतही होईल"

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवशी त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : संपूर्ण देशभरात सर्वांना सोबत घेऊन जाण्याची ताकद राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यात आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जो महाविकास आघाडी सरकारचा चमत्कार झाला. तसाच चमत्कार सन २०२४ साली दिल्लीत होईल, असा विश्वास राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी व्यक्त केला.

Chhagan Bhujbal
देशाचे राजकारण करायचे अन् गावातला सरपंच ऐकत नाही!

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त मुंबईत आयोजित व्हर्चुअल रॅली प्रसंगी ते बोलत होते. या व्हर्च्युअल रॅलीत नाशिक जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, शरद पवार यांच्या ६१ व्या वाढदिवसाला दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी प्रमुख पाहुणे होते. साहेबांना समजून घ्यायचे असेल तर लोक माझे संगती आणि नेमकेची बोलावे ही पुस्तके वाचावीत. त्यांनी राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात पवार साहेबांचे मोलाचे काम केले. कुस्तीला,क्रिकेटला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले. ते स्त्री- पुरुष समानता मानणारे आहेत. शरद पवार यांच्यावर अनेक वैचारिक हल्ले झाले पण त्यांनी संयम ठेवला. कृषी मंत्री म्हणून मोलाचे काम त्यांनी केले.

Chhagan Bhujbal
दादा भुसेंच्या व्यासपीठावर भाजपचे सुभाष भामरे शिवसेनेला डिवचतील का?

काही लोक म्हणतात साहेबांमूळे आरक्षण गेले. अहो त्यांनी तर आरक्षण दिले. ओबीसी आरक्षण महाराष्ट्रात मंडळ आयोग स्थापन करत करून पवार साहेबांनी दिले. भाजप चे मला कळत नाही. अध्यादेश आणला त्याला भाजपचे जनरल सेक्रेटरी चॅलेंज करतात. हे लोक म्हणजे `मूह मे एक बगल मे छुरी...` आरक्षणाला विरोध करणाऱ्या लोकांना जनतेने दारासमोर उभे करू नये. उद्या कोर्टात आम्ही लढण्याची तयारी केली आहे. राजकीय दृष्टया होत नाही म्हणून न्यायालयात नेऊन आरक्षण रद्द करण्याचे काम भाजप करत आहे.

यावेळी ते पुढे म्हणाले की, देशात साहित्य, शिक्षण, विज्ञान, कला, क्रीडा यासह विविध महत्वाच्या क्षेत्रात पवार साहेबांचे मोलाचे योगदान आहे. क्रीडा क्षेत्रात त्यांनी केलेलं काम जगभरात गाजलं असून कुस्तीला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविण्याचे काम त्यांनी केलं. कृषी क्षेत्रात त्यांनी दिलेल्या विशेष योगदानामुळे आज देश अन्न, धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असून फळबाग लागवड क्षेत्रातही अग्रभागी आहे. त्यांच्या या विशेष योगदानामुळे आज जगभरात अन्न,धान्याची फळांची निर्यात आपण करू शकत असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रतिभाताई पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस खासदार प्रफुल्ल पटेल, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकर , प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील,खा. अमोल कोल्हे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

व्हर्चुअल रॅली प्रसंगी नाशिक येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, नानासाहेब महाले, निवृत्ती अरिंगळे, बाळासाहेब कर्डक, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, नगरसेवक जगदिश पवार, समिना मेमन, सुषमा पगारे, नाशिक महानगरपालिका माजी विरोधीपक्षनेत्या कविता कर्डक, माजी नगरसेवक शैलेश ढगे, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, ओबीसी जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, संजय खैरणार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com