रावणदहनाचा वाद; भाजप आमदार जयकुमार रावलांवर ॲट्रॉसिटी दाखल

रावणदहनाच्या वादातून भाजपचे आमदार जयकुमार रावल व डॅा. हेमंत देशमुख यांचे परस्परांविरूद्ध तक्रारी दाखल.
Dr. Hemant Deshmukh & Jaykumar Rawal
Dr. Hemant Deshmukh & Jaykumar RawalSarkarnama

दोंडाईचा : दसऱ्याच्या दिवशी रावणदहनावरून (Ravan creamation) येथील पारंपरिक (Traditional) विरोधक रावल (Jaykumar Rawal) आणि देशमुख (Dr. Hemsnt Deshmukh) गटात वाद झाला. तो विकापोला जात पोलिस ठाण्यापर्यंत पोचला. (Police) दोन्ही गटांच्या परस्परविरोधी फिर्यादीनुसार माजी कामगार, न्याय व विधी राज्यमंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्यासह ३० समर्थकांवर गुरवारी रात्री , तर माजी पर्यटन, रोहयोमंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांच्यासह २० समर्थकांवर मध्यरात्रीनंतर दोनला गुन्हा दाखल झाला. (Police file FIR against BJP & NCP leaders in Dondaicha)

Dr. Hemant Deshmukh & Jaykumar Rawal
Nashik Accident| मुख्यमंत्र्यांनी घेतला घटनेचा आढावा; जखमींची चौकशी

येथील मांडळ रोडवरील शिक्षणमहर्षी दादासाहेब रावल नॉलेज सिटीच्या प्रांगणात ५ सप्टेंबरला २४ फूट उंचीच्या रावणदहनाचा सायंकाळी सहानंतर कार्यक्रम होता. त्या वेळी काश्‍मीऱ्या मारुती मंदिरासमोरील पटांगणात डॉ. देशमुख, डॉ. रवींद्र देशमुख, अमित पाटील, रवींद्र जाधव, नंदू सोनवणे व इतरांनी कटकारस्थानातून धार्मिक भावना दुखावणे, दोन समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने लोकांचा बेकायदेशीरपणे गैरजमाव पाठविला. त्यातून रावणदहनाच्या कार्यक्रमात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

Dr. Hemant Deshmukh & Jaykumar Rawal
Accident| मेटेंसारखा पुन्हा एक अपघात: मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीचा मृत्यू

आदिवासी भिल समाजाच्या जमावास दिलेल्या चिथावणीवरून युवराज सोनवणे, भारत जाधव, अंकुश सोनवणे, नागेश मालचे, अर्जुन मालचे व इतर २५ ते ३० जणांनी रावणदहनाच्या ठिकाणी आरडाओरड करीत कार्यक्रमास विरोध केला. ते आमचे आदिवासी भिल्ल समाजाचे पूर्वज आहेत, असे बोलून दहशत निर्माण केली. रावणाची प्रतिमा लाथा व काठ्या मारून पाडली, तसेच नुकसान करून रावणदहन होऊ दिले नाही. तेथून पळून गेले. त्यामुळे डॉ. देशमुख यांच्यासह समर्थकांविरुद्ध फिर्याद असल्याचे रामनाथ मालचे यांनी नमूद केले आहे.

या संदर्भात डॉ. देशमुख यांच्या निवासस्थानी पूर्वनियोजित बैठकीतून कटकारस्थान करण्यात आल्याचा फिर्यादीचा आरोप आहे.

रावल गटाविरुद्ध फिर्याद

परस्परविरोधात अंकुश नाईक यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की ३ सप्टेंबरला पोलिस ठाण्यात आदिवासी राजा रावण यांचे दहन करू नये, असे निवेदन एकलव्य भिल्ल जनसेवा मंडळाच्या दोंडाईचा शाखेने दिले. तरीही तसे झाल्यास निषेध व्यक्त केला जाईल, असा इशारा दिला होता. ५ सप्टेंबरला सकाळी काश्मीऱ्या मारुती मंदिरासमोर पटांगणात राजा रावणाची प्रतिकृती बनवू नये, असे संबंधित व्यक्तीस सांगितले. सायंकाळी कार्यक्रमावेळी उपस्थित नऊ जणांसह इतरांनी रावणदहन करून आदिवासी समाजाला उद्देशून भावना भडकविण्याचा प्रयत्न केला. आमदार रावल यांनी अवमानकारक शब्द वापरले व धमकी दिली. तसेच आमच्यावर खोट्या पद्धतीने गुन्हा दाखल केला. यात ज्यांना आरोपी करण्यात आले, त्यातील काही लोक दोंडाईचा शहरासह धुळे जिल्ह्यात उपस्थित नसून तसे पुरावे देऊ शकतो.

त्यामुळे आमदार रावल, सरकारसाहेब रावल, निखिल राजपूत, नरेंद्र गिरासे, चिरंजीवी चौधरी, रामकृष्ण मोरे, नारायण पाटील, प्रवीण महाजन, नरेंद्र राजपूत व इतर १५ ते २० जणांविरुद्ध फिर्याद आहे. यात इतर वीस संशयित वगळता आमदारांसह नऊ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com