Long March; शिंदे-फडणवीस सरकारनं माझा बाप नेला!

लाँग मार्चदरम्यान वाशिंदला पुंडलिक जाधव यांचे निधन झाले.
Kisan Sabha Long March
Kisan Sabha Long MarchSarkarnama

नाशिक : (Nashik) पाच वर्षांपूर्वी आम्ही लाँग मार्च (Long March) काढला होता. त्यावेळी सरकारने (Maharashtra Government) आश्वासन दिले, मात्र पुढे काहीच झाले नाही. त्यावेळी जर या मागण्या मान्य झाल्या असत्या, तर आमचा बाप मृत्यूच्या दाढेत गेला नसता. आता आमचा वाली कोण?, असा प्रश्न लाँगमार्चमध्ये मृत्यू झालेल्या जाधव यांच्या कन्येने केला आहे. (Pundlik Jadhav`s Family members made alligation on State Government)

Kisan Sabha Long March
Sanjay Raut; एकनाथ शिंदे गटाची हीच लायकी आहे!

किसान सभेने काढलेल्या नाशिक ते मुंबई लाँगमार्चमधील माकपचे कार्यकर्ते पुंडलिक अंबू जाधव (वय ५८) यांचा लाँगमार्च दरम्यान हृदयविकाराने निधन झाले. याबाबत त्यांच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला. त्यांच्या कन्या व पत्नीने आमची जमीन नावावर नाही. आम्ही सर्व मोलमजुरी करतो. घरातील कर्तापुरुष माणूस ल्यामुळे आम्ही उघड्यावर पडलो आहे, असे सांगितले.

Kisan Sabha Long March
Ramdas Athawale; ‘सतत जे म्हणतात खोके त्यांचे फिरलय डोके’

दिंडोरी तालुक्यातील वणीजवळील मावडी येथील जाधव त्यांच्या निधनाने आदिवासी कार्यकर्ते, ग्रामस्थांत शोककळा पसरली आहे. जाधव यांच्यावर सकाळी मावडी येथे अंत्यसंस्कार झाले. त्यांच्यामागे पत्नी बेबी जाधव, मुलगा गणेश, मुलगी असा परिवार आहे.

विविध मागण्यांसाठी शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांनी विधानसभेवर नाशिक ते मुंबई पायी लाँगमार्च काढला असून, हा लाँगमार्च मुंबईच्या वेशीवर पोचला होता. मात्र, यादरम्यान ही दु:खद घटना घडली, त्यात एका आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे.

Kisan Sabha Long March
Nashik News : ठाकरेंना धक्क्यावर धक्के : उपनेतेपदी असलेल्या दिग्गज नेत्याची कन्या भाजपच्या वाटेवर!

जाधव यांना लाँग मार्चदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने मोर्चेकऱ्यांनी त्यांना तातडीने शहापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेची माहिती दिली. त्यानंतर मृत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखांची मदत दिली जाईल, अशी माहिती पालकमंत्री दादा भुसे यांनी कळविली आहे.

दरम्यान, मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देणेकामी प्रशासकीय पातळीवर अग्रक्रम देण्यात येईल, अशी माहिती दिंडोरीचे तहसीलदार पंकज पवार यांनी दिली. हजारो शेतकऱ्यांसमवेत लाँगमार्चमध्ये सहभागी झाले होते. यापूर्वी देखील याच मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढण्यात आला होता.

Kisan Sabha Long March
Amruta Pawar News; छगन भुजबळ यांच्या त्रासामुळेच राष्ट्रवादी सोडला!

जाधव यांच्या पत्नीलाही हृदयविकाराचा त्रास असून त्यांच्यासाठी हा धक्का असल्याची भावना भाऊ सुनील जाधव यांनी व्यक्त केली. घटनेनंतर तहसीलदार पंकज पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश बोडखे, मंडल अधिकारी यांनी जाधव कुटुंबीयांचे सांत्वन केले व शासकीय निधीतून जाधव कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, अशी माहिती दिली.

...

पती वन जमीन नावावर करण्यासाठी व ती मिळवण्यासाठी काही वर्षांपासून लढा देत होते. परंतु त्यांची कोणीच दखल घेतली नाही. जीव गेला; पण जमीन नाही मिळाली. आता माझे कुंकू पुसले गेले. त्यामुळे हा लढा कसा लढायचा, आम्ही आजही मोलमजुरी करून पोट भरत आहे. आमचा कर्ता माणूस गेल्यामुळे आम्ही कोणांकडे न्याय मागायचा.

--बेबीताई जाधव (पुंडलिक जाधव यांच्या पत्नी)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com